वालचंद डायरीज् – भाग २१
वालचंद डायरीज् – भाग २१ वालचंद सोडताना गेले सलग २० दिवस (मध्ये दोन दिवस सुट्टी सोडून) वालचंद कॉलेज मधले माझे अनुभव लिहितो आहे. लिहिण्यासारखे अजून बरेच आहे. पण मी काही लेखक नव्हे. तेंव्हा वाचकांना कंटाळा येण्यापूर्वी थांबलेलं चांगलं. नाही का ? खरंतर स्वतःसाठी म्हणून लिहायला सुरुवात केली होती. माझे वालचंदमधले अनुभव मी सगळ्यांसाठी शब्दबद्ध करावेत म्हणून पाठपुरावा करणारी विद्यार्थिनी मैत्रीण वैष्णवी आणि हे लेखन ब्लॉग रूपात पब्लिश करायचं ठरवल्यावर blog चे होमपेज वगैरे तयार करायला मदत करणारी ऋतुजा आणि सुरुवातीचे काही भाग बारकाईने वाचून त्यात सुधारणा सुचवणारा एक विद्यार्थी मित्र आदित्य सर्वांनाच मनापासून धन्यवाद...मी सुचेल तसं लिहित जायचो , त्यामुळे लेखाचा आशय मला किंवा काँलेज संबंधित कुणी वाचला तर समजेल असा असायचा .पण बाहेरच्या कुणी हे लेख वाचले तर संदर्भ लागतील असे नव्हते. शिवाय अनेकदा माझं लेखन complecated व्हायचं. संयुक्त वाक्यं व्हायची. मग प्रत्येक भाग बारकाईने वाचून त्यात सुटसुटीतपणा , सोपेपणा आणण्याचं आणि वाक्यरचना , शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्...