परिस्थिती
परिस्थिती
रस्त्यावरती दिसली मला एक गजरेवाली पोर
शाळा तिची बुडते आहे याचा मनी घोर
म्हणत होती ती," ताई एक गजरा घेना"
तिच्यासाठी काय करावे मला काहीच सुचेना
' जातेस का गं शाळेत?' असे विचारले मी तिला
म्हणाली ती," कधीतरी जाते, वेळ नाही मला"
पैसे देऊन तिला, मी एक गजरा घेतला
तिनेही शाळेत जावे असे वाटत होते मला
द्यावेत तिला अजून पैसे असे सांगते मन, पण
'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' अशी तिची शिकवण
जाताना घरी तिचे विचार होते माझ्या ध्यानी
मी किती भाग्यशाली हा विचार आला मनी
वैष्णवी उरमोडे, इ. १०वी

Comments
Post a Comment