Posts

Showing posts with the label Marathi

कविता -.मराठी मुलगी

 मराठी मुलगी -वाणी कोयाळीकर, इ.६वी मुली एक होती मराठी मुलगी, विलक्षण होती तिची बुद्धी. करीत होती सतत गडबड, घरात चालत असे अखंड बडबड. वय वर्ष झाले दोन, शाळेच्या शोधासाठी सुरु झाले फोन. गल्ली बोळात सर्वत्र भरपूर शाळा, इंग्रजी भाषिक माध्यमाचा भरला होता मेळा. एक शाळा निवडण्यात आली, कारण घराच्या जवळ ती मिळाली. मराठी मुलगी झाली शाळेसाठी आतूर, मनात तिच्या विचारांचे काहूर. नवीन दप्तर नवीन गणवेश, तिला काय माहीत, मराठी होणार होते नामशेष. शाळेचा पहिला दिवस उजाडला, 'डोंट टऑक इन मराठी' चा हल्ला सुरु झाला. शाळेत असे 'हॉर्स रायडिंग' व 'स्विमिंगपूल',  मातृभाषेला मात्र दिली होती हूल. दिवस जात होते झटपट, काहीतरी मात्र निसटून जात होते पटपट. मराठी मुलीला शाळेत लागली तहान, इंग्रजी शब्द शोधता शोधता तहान झाली लहान. काय करणार बिचारी बसली शांत गुमान, इंग्रजी माध्यमाचा महिमाच होता तसा महान. मराठी मुलगी विसरून गेली शी-शू तहान भूक, तिच्या अखंड बडबडीला इंग्रजी माध्यमानी लावले हुक. होत्या तिच्याकडे भावना खूप, परंतू माध्यम मात्र होते चूक. अबोल झाली गोजिरवाणी, आई वडिलांना उलगडली त...

स्वरसंवाद

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात सुमारे चार लाख राग आहेत. प्रत्येक रागाचे आपापले एक वैशिष्ट्य आहे. विविध संगीत प्रकारात या रागांचा वापर होतो. त्यापैकीच काही रागांची माहिती, विस्तार, तो कसा ओळखला जाऊ शकतो व त्यावर आधारित गाणी इत्यादी माहिती स्वरसंवाद! (Swarasamvad!) या  युट्युब चॅनेल द्वारे देण्याचा प्रयत्न सईनेे लॉकडाऊनच्या काळात केला आहे व अजूनही अभ्यास करून नवनवीन राग उलगडण्याचा प्रयत्न करते आहे. राग भूप, राग हंसध्वनी, राग चारुकेशी, राग किरवणी या व अशा २१ रागांचे  व्हिडीओ आत्तापर्यंत बनवले आहेत, त्याची लिंक खाली देत आहोत. https://www.youtube.com/playlist?list=PL4XqjJiFZ40_aLMjmjwjtRXhB22XVAKdi सई वैभव जोशी, इयत्ता दहावी

कविता -निसर्ग

 मी गच्चीत उभी होते, एकटक बघत आणि शांत... चहूबाजूंनी असलेला निसर्ग मला मोहवत होता तरीही मी तशीच उभी होते! इतक्या रंगछटा बघून मन सुखावून गेलेले पण आपल्याला सगळे दुरूनच बघावे लागत असल्याने मन खट्टू झालेले. ते सौंदर्य पाहून आठवले पन्हाळगड ते विशाळगड ट्रेकमध्ये मध्ये लागलेले डोंगर धबधबे, रायरेश्वरला अनुभवलेला शिळंधार पाऊस, राजगडावरील निसरडी वाट आणि अशा किती किती गोष्टी मनात डोकावून गेल्या. तेव्हा अचानक जाणीव झाले की असंख्य सुंदर रंगांनी बनलेला असा हा निसर्ग आहे. तनामनाला शीतलता देणारा निळसर जलदातून पडणारा पाऊस, डोळ्यांना सुखावणारा सृजनाचा हिरवा रंग, धरणीकडे झेपावणाऱ्या धबधब्याचा शुभ्रपांढरा रंग आणि विविधरंगी फुलांची तर कथाच न्यारी! या सर्वांनी भरून गेलेला असा हा ओला निसर्ग..... गडद निळे जल आले डोंगर दरी दगड न्हाले भरलेल्या आभाळावर मोर थुईथुई नाचले हिरव्या पर्वतरांगा हिरवे धरणीतले बीज हिरवे मन माझेही झाले विपुल आनंदे खडकाला झरे फुटले दुग्धापरि शुभ्र रे मनपटलवरचे सारे दुःख दोष मिटले रे सजले रे रंग माझे निसर्गासम सुंदरसे वेचू नितळ सौंदर्यात आयुष्याचे कवडसे....         ...

पाडस

Image