Posts

Showing posts with the label Prabodhini

बीज प्रबोधिनी

Image
सानिका वाडेकर ( तुकडी २०१२ ) माझ्या आयुष्यातलं प्रबोधिनीचं स्थान सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न, प्रबोधिनीलाच अर्पण.. माझ्या अंगणीचा चाफा तुझा गंध दरवळे इंद्रधनू साकाराया  तू किरण कोवळे माझी भरजरी पैठणी तू रेशमाची वीण चक्रव्यूह भेदण्यासी तूच निषाणीची खूण  सरभरल्या मेघाचे   तू मोकळे आकाश  कुण्या अंधारल्या वाटे  तूझी सोबत प्रकाश बांध फुटल्या पाण्याची तू केलीस वाहिनी माझ्या फुलल्या वेलीचे तू बीज प्रबोधिनी - सानिका वाडेकर

“ती. ज्ञान प्रबोधिनीस”

Image
चैत्राली वैद्य - काणे (1995 तुकडी) इथे झळाळी कर्तृत्वाची  सोन्याचे की काय मोल पैलू पडता व्यक्तित्वाला तेज हिऱ्याचे ठरते फोल। सुजनांची ही मांदियाळी सुविचारांचा वाहे झरा तरुणाईचा उत्साह खळाळे       त्यास दिशा देई तू किनारा। तुझ्या अंगणी पडले जेव्हा       पहिले पाऊल माझे गं ओली माती अन् कुंभाराचे       जुळले नाते कायमचे गं। बालपणीचा काळ आठवे         हात असा धरलास तू कधीही न विरले घट्ट बंध हे      आले गेले किती ऋतू। गुरुजनांच्या छत्रछायेत मिळाला   संस्कारांचा अमूल्य ठेवा तू किती करांनी द्यावा          अन् मी किती करांनी घ्यावा। अजूनही जेव्हा डोळे मिटता     ॐकाराचा घुमतो नाद उपासनेची धीर गंभीरता अन्    शुचिता भरुनी राहते मनात। आजही मन कधी चिंतीत होता    आठव तुझाच येतो उजळणी करता आठवणींची       मार्ग आपसूक दिसतो। आज पुन्हा भेटीला आलो...

की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने

Image
अमित रानडॆ (1999) ज्ञान प्रबोधिनी... "अविद्यया मृत्यूं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते" - ईशावास्य उपनिषदांमधला ११ वा श्लोक हे बोधवाक्य असलेली एक प्रशाला... पुण्यामध्ये असलेल्या अनेक प्रशालांपैकी एक, ज्याचे वेगळेपण प्रशाले मध्ये प्रवेश घ्यायच्या आधी एका मंदिर रुपी इमारतीच्या रचनेने डोळ्यात भरते, नंतर कालांतराने त्या प्रशालेत प्रवेश मिळाल्यावर बाकीच्या गोष्टींमुळे त्याचे वेगळेपण अजून मनावर अधिराज्य गाजवते... प्रशालेत शिक्षण घेताना, पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानाचे शिक्षण ह्या शाळेमध्ये मिळाले व ते पण कमी की काय... व्यक्तिमत्व विकास, अभिव्यक्ती च्या तासांना शिकलेल्या अनेक विषयांनी आयुष्याला पैलू पाडले. आज प्रशालेमध्ये शिक्षण घेऊन २० वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा दैनंदिन व्यवहार, नोकरी व व्यवसाय करताना प्रत्येक वेळेला मनात सुखात्मक जाणीव होते की ह्या सर्व गोष्टींचा पाया पक्का करून घेतला तो फक्त ज्ञान प्रबोधिनी प्रशालेनी. ज्ञान प्रबोधिनी हे शालेय शिक्षणासोबतच शारीरिक शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, अध्यात्मिक बैठक, व्यावसायिक प्रशिक्षण, अभ्यासोत्तर उपक्रम व अनेक व्यावहारिक गोष्ट...