Posts

Showing posts from May, 2020

वालचंद डायरीज् – भाग १५

वालचंद डायरीज् – भाग १५ वर्गापलीकडे शिक(व)ताना – २       आज विचार करताना वालचंद मधल्या माझ्या कारकिर्दीचे तीन महत्त्वाचे टप्पे स्पष्टपणे जाणवत आहेत. टप्पा १ - पहिली ४ वर्ष-- फेब्रुवारी २००९ ते   डिसेंबर २०१२ पर्यंत – ह्यात नवीन विषय शिकवण्यासाठी तयारी करणे , वर्गाध्यापानाचे तंत्र शिकणे आणि नव्या उत्साहात काही उपक्रम सुरु करणे. टप्पा २ – जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१६ – या कालावधीत शिक्षणाविषयीचा जास्ती systematic विचार करून नवे प्रयोग केले.   सुरु केलेले अनेक उपक्रम नियमितपणाने चालू ठेवण्यासाठी धडपड केली. टप्पा ३ – जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१९ अशी शेवटची तीन वर्षे – या कालावधीत मुख्यतः ३ नवीन गोष्टी केल्या. १) आधी केलेले काही प्रयोग परत परत करून पहिले २) २ नवीन विषय शिकवायला घेऊन वेगळ्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केला. ३) एकाच वर्गाला पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत शिकवत जाण्याचा प्रवास       इतके दिवस परिच्छेद स्वरुपात लिहिणारा मी आज अचानक असा मुद्देसूद कसा लिहायला लागलो याचं अनेकांना आश्चर्य वाटत असे...

वालचंद डायरीज् – भाग १४

वालचंद डायरीज् – भाग १४ वर्गापलीकडे शिक(व)ताना -१       शीर्षक थोडं वेगळं वाटतंय ना ? पण हो , वर्गापलीकडे म्हणजे , वर्गाच्या विषयापलीकडे आणि वर्गाच्या भिंतींपलीकडे. अश्या वर्गांच्या सीमा ओलांडल्या की शिक्षक- विद्यार्थी असं द्वैत उरत नाही. सगळेच त्या शिक्षण प्रक्रियेचा एक भाग बनतात आणि नवनवीन गोष्टी शिकायला लागतात. अर्थात , वर्गातला विषय शिकवत असताना सुद्धा शिक्षकाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत असतातच.       वर्गात नेमून दिलेला विषय शिकवणं हे तर शिक्षकाचं पाहिलं कर्तव्य आहेच. पण त्यापलीकडे पण विविध गोष्टींविषयी बोलणं , अनुभव share करण हे ही शिक्षकांनी केलं पाहिजे. माझ्या सुदैवाने शाळेमध्ये असे अनेक शिक्षक अनुभवले होते की जे आपला विषय उत्तम शिकवत होतेच पण त्या बरोबरच आमचं अनुभव विश्व मोठं करण्यासाठी प्रयत्नशील होते. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर मैदानावर कबड्डी शिकवताना त्यातलं physics सांगणारे आणि वर्गात physics शिकवताना कबड्डीमधले त्याचे application शिकवणारे डॉ. विवेक कुलकर्णी सर आजही आठवतात. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर कायमच असतो...

तू येशील ना?

Image
तू येशील ना?                         तू येशील ना?                         माझ्या पहिल्या पायरीशी तुझं मस्तक लवेल                         धूळ कपाळाला टेकेल                         वर पाहशील                         तुला दिसतील ते लांबवर जाऊन थांबणारे डोळे                         तो उद्धरलेला हात                         म्हणशील मग तू मनात,                        'अप्पा, लक्ष असुद्या!'                        त्यांचं लक्ष आहेच रे,      ...

वालचंद डायरीज् – भाग १३

वालचंद डायरीज् – भाग १३ शिक्षकांच्या समस्या, राजकारण आणि संघटना       मी विद्यार्थ्यांमध्ये रमणारा एक शिक्षक होतो , आहे. पण विद्यार्थ्यांपलीकडे शिक्षकांच्या काही समस्या असतात. आणि त्यांना तोंड द्यावे लागतेच. सुरुवातीपासून ज्या समस्या समोर आल्या त्यापैकी एक म्हणजे DCPS. आधी थोडी पार्श्वभूमी सांगतो. वालचंद कॉलेज हे एक सरकारी अनुदानित महाविद्यालय आहे. त्यामुळे सगळे सरकारी नियम इथे काम करणाऱ्यांना लागू होतात. १ नोव्हेंबर २००५ नंतर सरकारी नोकरीमध्ये रुजू झालेल्यांना निवृत्ती वेतनाचा( पेंशन) लाभ मिळणार नाही असा नियम झाला त्याचवेळी DCPS (Departmtmental Contributory Pension Scheme) लागू करण्यात आली. साधारण EPF सारखीच याची रचना. पण त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नव्हती. कायद्याप्रमाणे PF चे पैसे त्या त्या महिन्यात कट करून योग्य ठिकाणी भरावे लागतात. पण इथे तर सगळा आनंदी आनंद होता. सरकारी कामात “ देर है पर अंधेर नही ” असं म्हणतात हे खरं , पण इथे कशाची हालचालच नव्हती. माझे स्वतःचे Tata Motors मधले PF चे पैसे इकडे हस्तांतरित करायचे होते. त्यासाठी मी खूप वेळा कॉलेज...

वालचंद डायरीज् – भाग १२

वालचंद डायरीज् – भाग १२ वालचंदमधील क्लब आणि मी       वालचंदकॉलेजमधील क्लब सिस्टीम हा एक अफलातून प्रकार आहे. अभ्यासपूरक ( co-curricular) आणि अभ्यासेतर ( extra curricular) उपक्रमांची खूप चांगली रचना या क्लबच्या माध्यमातून होत असते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये मोठे योगदान या सगळ्या क्लबचे आहे यात दुमत असणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या त्याच्या आवडीनुसार सामावून घेता येईल असे अनेक विषय इथे हाताळले जातात. प्रत्येक क्लबचे असे स्वतःचे वैशिष्ट्य आणि परंपरा तयार झालेली आहे. व्यक्तिमत्त्व विकसन हेच उद्दिष्ट असलेला PACE क्लब असो किंवा सामाजिक बांधिलकी जपणारा ROTARACT क्लब असो , खास सांगलीकर मंडळींसाठी चालू झालेला SOFTA असो किंवा कलाकारांचा ART CIRCLE क्लब असो प्रत्येक क्लब आपापले काम चोख करत असतो. या बरोबरच प्रत्येक विभागाचा technical क्लब म्हणजे MESA, CESA , EESA , ELESA वगैरे आहेतच. आजही कुठलाही अगदी जुना माजी विद्यार्थी भेटला तर कॉलेज मधल्या आपल्या क्लबविषयी आस्थेने चौकशी करत असतो.       विद्यार्थीदशेमध्ये मी ...

वालचंद डायरीज् – भाग ११

वालचंद डायरीज् – भाग ११ वर्गात शिकवताना -४         २०१३-१४ पर्यंत हळूहळू वालचंद कॉलेज नेमकं कसं आहे ते थोडं थोडं कळायला लागलं होतं. त्यामुळे स्वतःपुरते का होईना काही बदल करायचे असतील तर काय काय करावं लागेल याचा अंदाज आला होता. किंवा काही बदल करायचे असतील तर ते system च्या गतीने करण्याएवढा patience वाढला होता. मी काल लिहिलं होतं त्याप्रमाणे आपण प्रत्येक जण विद्यार्थीदशेमध्ये परीक्षार्थी जास्ती असतो. त्यामुळे “Quality of Exam determines quality of education” हे खूप प्रमाणात सत्य असतं. पण गंमत अशी आहे , की ‘Quality of Exam cannot be higher than quality of teaching-learning’ आणि ‘teaching learning process is majorly driven by teacher’. खूप philosophical होतंय ना ? पण काय करणार गेल्या काही वर्षांमध्ये NBA, NACC, ABETTE या सगळ्यांमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये objectives, outcomes, OBE, SCE वगैरे सारख्या अनेक jargons नी प्रवेश केला आणि मग असं काहीतरी अवघड अवघड बोललं किंवा लिहिलं की भारी समजलं जायला लागलं. एखादा शिक्षक नेमकं कसं शिकवतो , विषय कसा पोचवतो , परीक...