अ ब क ड कोरोना आणि होमिओपॅथीबद्दल-
अ ब क ड कोरोना आणि होमिओपॅथीबद्दल- काय आहे नक्की गोंधळ आणि वास्तव मागच्या लेखात आपण कोरोना संसर्ग होवू नये यासाठी काय काय काळजी घरी घेता येईल आणि Lockdown मधील सुज्ञ तणाव नियोजन याबद्दल सविस्तर शास्रशुद्ध माहिती घेतली. आता या लेखामध्ये आपण त्यापुढे जाऊन प्रत्यक्ष कोरोना आजार, त्याचे उपलब्ध उपचार आणि त्यामधील होमिओपॅथी ची नक्की काय भूमिका आहे हे बघणार आहोत. अतिशय क्लिष्ट वैदकीय प्रक्रिया आणि शास्रीय माहिती आपणासमोर जेवढे शक्य आहे तेवढे सोपे करून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जेणेकरून तुम्हाला स्वतः निश्चित दिशा ठरवता येईल आणि काही ठाम निर्णयाला पोहोचता येईल. कारण सध्या तेवढीच एक गोष्ट मुबलक प्रमाणात आहे ती म्हणजे 'अनिश्चितता'. जरी विषय जरा जड वाटत असेल तरी आपल्यावर जर युद्धाचा प्रसंग आलाच आहे तर आपल्य़ा कडील शस्र साठा आणि शत्रूची शस्रे, त्याची युद्ध नीती यांची आपल्याला माहीतीच नसेल तर आपण लढण्याआधीच हार मानण्यासारखेच झाले, आणि ते कुठल्याही सुज्ञ हुशार व्यक्तीला न पटणारे आहे. आपण ब...