Posts

वालचंद डायरीज् – भाग १७

वालचंद डायरीज् – भाग १७ E fficycle ची सुरुवात जानेवारी २०११ मध्ये पहिले Baja झालं. टीमला बक्षीस नाही मिळालं पण कॉलेजमध्ये त्याची पुरेशी हवा झाली. अर्थात या सगळ्या प्रक्रियेतून मिळालेले अनुभव इतके विलक्षण होते की लगेचच पुढची टीम तयार व्हायला लागली. पहिली टीम तयार होताना २५ जण मिळतील का अशी शंका होती तर आता कोण २५   निवडायचे असा प्रश्न पडला. आधीचा अनुभव , तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य अशा काही कसोट्या लावून २५ जणांची टीम तयार झाली. पुढचा वादाचा मुद्दा आला की संघाचा कप्तान कोण ? पहिली टीम तयार होताना असा काही वाद झालाच नव्हता. किंवा झाला असला तरी आमच्या पर्यंत आलेला नव्हता. (नंतरही २०१९ पर्यंत जवळ जवळ वीस टीमबरोबर अशा वेगवेगळ्या स्पर्धांसाठी काम केलं पण कप्तान पदावरून कधीच वाद झाला नाही.) यावेळी कप्तान व्हायला दोघे उत्सुक होते. दोघेही तुल्यबळ होते. जवळजवळ आठ दिवस यावर चर्चा , भांडणं चालू होती. निर्णय घेणं आम्हाला दोघांनाही अवघड वाटत होतं. शेवटी लोकशाही पद्धतीने निर्णय घेतला आणि एकाचं नाव कप्तान म्हणून जाहीर केलं. पण लगेच दुसरा इच्छुक उमेदवार आणि त्याच्या बरोबर आणखीन दोन तीन लोकांनी...

संभाजी महाराज

Image
                                                                                              सई देसाई,इ. ६ वी

वालचंद डायरीज् – भाग १७

वालचंद डायरीज् – भाग १७ BAJA – एका वेगळ्या परंपरेची सुरुवात नोव्हेंबर किंवा डिसेंबर २००९ मधली एक सकाळ. Third year मधल्या चार-पाच विद्यार्थ्यांचा एक गट भेटायला आला. बहुधा ही सगळीच मंडळी सांगलीकर होती म्हणजे कॉलेजच्या भाषेत बोलायचं झालं तर localities. एका स्पर्धेविषयी त्यांना माहिती कळलेली होती आणि कॉलेजची टीम म्हणून त्यात भाग घ्यावा असं त्यांना वाटत होतं. त्यांनी त्यावेळी मला सांगितलेली माहिती अशी - BAJA ( उच्चार बाहा ) नावाची ही स्पर्धा जगभरात अनेक देशांमध्ये होते. SAE म्हणजे सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनिअर ही संस्था/संघटना/ऑर्गनायझेशन या स्पर्धेचे आयोजन त्या-त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करते.   भारतात ही स्पर्धा सुरू होऊन दोन वर्ष झालेली आहेत आणि दरवर्षी साधारण जानेवारी मध्ये ही स्पर्धा इंदोरला होते. पण स्पर्धा कसली ? तर २५ विद्यार्थ्यांच्या टीमने मिळून एक गाडी म्हणजे All Terrain vehicel (ATV) डिझाईन करायची , कॉलेजमधे बनवायची आणि स्पर्धेच्या ठिकाणी विविध ट्रॅकवर चालवायची. वाचून खूप भारी वाटला ना ? माझीही अवस्था काहीशी तशीच...

भारत

Image
                                                                                                       सई देसाई,इ. ६ वी

वालचंद डायरीज् – भाग १६

वालचंद डायरीज् – भाग १६ वर्गापलीकडे शिक(व)ताना –३       First Year च्या विद्यार्थ्यांना शिकवायची संधी खूप कमी वेळा मिळाली. २०११ मधे एकदा electronics च्या वर्गाला शिकवलं होतं. परत तशी संधी जानेवारी २०१७ मधे मिळाली. ह्यावेळी mechanical चा वर्ग होता. विषय Engineering Graphics. first year च्या वर्गात हा विषय शिकवणं हे एक वेगळं आव्हान असतं. एक म्हणजे १२वी पर्यंत शिकण्याची आणि अभ्यासाची पद्धत खूप वेगळी असते , विद्यार्थी अजून त्यातून बाहेर आलेले नसतात. आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष फळ्यावर कमीतकमी साधनांचा वापर करून काढावी लागणारी असंख्य drawing. पण एक गोष्ट चांगली असते की वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांकडून शिक्षकाबद्दल फारसं काही कळलेलं नसतं. तुम्ही वर्गात जाता ती एक blank image घेऊन.       अशीच काहीशी blank image घेऊन एका दुपारच्या एका तासाला मी ह्या वर्गात गेलो. नेहमी प्रमाणेच स्वतःची ओळख करून देण्यापेक्षा तुम्ही मला प्रश्न विचारा आणि त्याच्या उत्तरांमधून माझी ओळख करून घ्या असा वेगळा प्रकार केला. अपेक्षेपेक्षा खूप वेगळे प्रश्न विचारले...

वालचंद डायरीज् – भाग १५

वालचंद डायरीज् – भाग १५ वर्गापलीकडे शिक(व)ताना – २       आज विचार करताना वालचंद मधल्या माझ्या कारकिर्दीचे तीन महत्त्वाचे टप्पे स्पष्टपणे जाणवत आहेत. टप्पा १ - पहिली ४ वर्ष-- फेब्रुवारी २००९ ते   डिसेंबर २०१२ पर्यंत – ह्यात नवीन विषय शिकवण्यासाठी तयारी करणे , वर्गाध्यापानाचे तंत्र शिकणे आणि नव्या उत्साहात काही उपक्रम सुरु करणे. टप्पा २ – जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१६ – या कालावधीत शिक्षणाविषयीचा जास्ती systematic विचार करून नवे प्रयोग केले.   सुरु केलेले अनेक उपक्रम नियमितपणाने चालू ठेवण्यासाठी धडपड केली. टप्पा ३ – जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१९ अशी शेवटची तीन वर्षे – या कालावधीत मुख्यतः ३ नवीन गोष्टी केल्या. १) आधी केलेले काही प्रयोग परत परत करून पहिले २) २ नवीन विषय शिकवायला घेऊन वेगळ्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केला. ३) एकाच वर्गाला पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंत शिकवत जाण्याचा प्रवास       इतके दिवस परिच्छेद स्वरुपात लिहिणारा मी आज अचानक असा मुद्देसूद कसा लिहायला लागलो याचं अनेकांना आश्चर्य वाटत असे...

वालचंद डायरीज् – भाग १४

वालचंद डायरीज् – भाग १४ वर्गापलीकडे शिक(व)ताना -१       शीर्षक थोडं वेगळं वाटतंय ना ? पण हो , वर्गापलीकडे म्हणजे , वर्गाच्या विषयापलीकडे आणि वर्गाच्या भिंतींपलीकडे. अश्या वर्गांच्या सीमा ओलांडल्या की शिक्षक- विद्यार्थी असं द्वैत उरत नाही. सगळेच त्या शिक्षण प्रक्रियेचा एक भाग बनतात आणि नवनवीन गोष्टी शिकायला लागतात. अर्थात , वर्गातला विषय शिकवत असताना सुद्धा शिक्षकाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत असतातच.       वर्गात नेमून दिलेला विषय शिकवणं हे तर शिक्षकाचं पाहिलं कर्तव्य आहेच. पण त्यापलीकडे पण विविध गोष्टींविषयी बोलणं , अनुभव share करण हे ही शिक्षकांनी केलं पाहिजे. माझ्या सुदैवाने शाळेमध्ये असे अनेक शिक्षक अनुभवले होते की जे आपला विषय उत्तम शिकवत होतेच पण त्या बरोबरच आमचं अनुभव विश्व मोठं करण्यासाठी प्रयत्नशील होते. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर मैदानावर कबड्डी शिकवताना त्यातलं physics सांगणारे आणि वर्गात physics शिकवताना कबड्डीमधले त्याचे application शिकवणारे डॉ. विवेक कुलकर्णी सर आजही आठवतात. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर कायमच असतो...