वालचंद डायरीज् – भाग १०
वालचंद डायरीज् – भाग १० वर्गात शिकवताना -३ २०१२ मधे PhD चे course work करायला IIT मुंबईत गेलो. परत एकदा ( मी MTech तिथंच केलं होतं , म्हणून म्हंटलं परत एकदा)अनेक चांगल्या प्राध्यापकांच्या तासांना बसायची संधी मिळाली. मी MTech करताना मी केवळ विद्यार्थी होतो..पण PhD course work करताना मी विद्यार्थी आणि वालचंदमधे शिकवत असल्याने शिक्षकही होतो..माझे guide डॉ. सलील कुलकर्णी यांच्याबरोबर अनेकदा चर्चा व्हायची. ते तयारी कशी करतात , काय विचार करतात हे समजायचं. खऱ्या अर्थाने autonomous institute असलेल्या IIT संस्थेमध्ये प्रत्येक शिक्षक वेगवेगळे प्रयोग करत असायचा. . प्रत्यक्ष शिकवण्यामधली विविधता , वेगळ्या प्रकारच्या assignment देणे , परीक्षा घेताना विविध पद्धती वापरणे हे सगळं जवळून बघायला मिळालं. आणि त्यातलं आपल्याला वालचंदमधे काय काय वापरता येईल असा विचार सुरु झाला. .एक मात्र पक्कं ठरवलेलं होतं कि IIT मधलं असलं तरी जसंच्या तसं काही कॉपी करायचं नाही. त्या त्या विषयाची गरज ओळखून आणि वालचंदची पार्श्वभूमी लक्षात घेऊन योग्य वाटतील ते बदल करायचे. लगेचच्या स...