अ ब क ड कोरोना आणि होमिओपॅथीबद्दल-

अ ब क ड  कोरोना आणि होमिओपॅथीबद्दल-
काय आहे नक्की गोंधळ आणि वास्तव

        मागच्या लेखात आपण कोरोना संसर्ग होवू नये यासाठी काय काय काळजी घरी घेता येईल आणि  Lockdown मधील सुज्ञ तणाव नियोजन याबद्दल सविस्तर शास्रशुद्ध माहिती घेतली.
   आता या लेखामध्ये आपण त्यापुढे जाऊन प्रत्यक्ष कोरोना आजार, त्याचे उपलब्ध उपचार आणि त्यामधील होमिओपॅथी ची नक्की काय भूमिका आहे हे बघणार आहोत. अतिशय क्लिष्ट वैदकीय प्रक्रिया आणि शास्रीय माहिती आपणासमोर जेवढे शक्य आहे तेवढे सोपे करून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जेणेकरून तुम्हाला स्वतः निश्चित दिशा ठरवता येईल आणि काही ठाम निर्णयाला पोहोचता येईल. कारण सध्या तेवढीच एक गोष्ट मुबलक प्रमाणात आहे ती म्हणजे 'अनिश्चितता'.
         जरी विषय जरा जड वाटत असेल तरी आपल्यावर जर युद्धाचा प्रसंग आलाच आहे तर आपल्य़ा कडील शस्र साठा आणि शत्रूची शस्रे, त्याची युद्ध नीती यांची आपल्याला माहीतीच नसेल तर आपण लढण्याआधीच हार मानण्यासारखेच झाले, आणि ते कुठल्याही सुज्ञ हुशार व्यक्तीला न पटणारे आहे.
   आपण बघुयात
1) Immunity प्रतिकारशक्ती म्हणजे नक्की काय असते

प्रतिकारशक्ती चे 2 प्रकार आहेत

 a) ➡जन्मजात मिळालेली प्रतिकारशक्ती...Innate
   आपले शरीर हे सदैव प्रत्येक क्षणी आपल्या संरक्षणासाठी सज्ज असतें.
मानवी शरीराची रचना इतकी कुशलतेने केलेली आहे की कुठलाही धोका, आक्रमण झाल्यास काही सेकेंदा मधे शरीराची सुरक्षा यंत्रणा प्रतिक्रिया देत आपल्या रक्षणा साठी पूर्ण तयार होवून शत्रू शी लढून त्याला हरवून,नेहमीच आपल्याला संकटातून बाहेर काढत असतें.
   जंतूसंसर्ग हे एक आक्रमण मानल्यास आपले शरीर त्या जंतूना , शरीरात होणाऱ्या त्यांच्या प्रवेशा पासूनच पुढे ही प्रत्येक वेगवेगळ्या अवयवांठिकाणी ज्या आपल्या सुरक्षा पेशी आहेत त्या या जंतूंवर हल्ला चढवून त्यांना शरीराबाहेर काढतात,आणि कुठल्याही संसर्ग आजारतूण आपल्याला सुखरूप बाहेर काढते.
या जन्मजात मिळालेल्या किंवा खास प्रयत्न करून मिळवलेल्या यंत्रणेला प्रतिकारशक्ती असे म्हणतात.
     प्रतिकारशक्ती ही कुठल्याही जंतू सन्सर्गा पूर्वीच शरीरात उपलब्ध असायला हवी, ती अचानक बनवता येत नाही.
     सातत्याने खास प्रयत्न करून कशी प्रतिकारशक्ती वाढवायची याबद्दल मी काही महत्वाचे मूद्दे मागील लेखात सांगितले आहेत.
    * प्रतिकारशक्ती चे प्रत्यक्ष कार्य नक्की कसे चालते

       कुठल्याही प्रकारचे जंतू जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा शरीराच्या त्या त्या भागातील पेशी जशा की  Macrophages, T cells ,  B-lymphocytes   आणि अशा अजून बर्याच पेशी त्या जंतूविरुद्ध लढणारे प्रतिपिंड ( Antibodies) तयार करण्यासाठी स्वतः रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ तयार करते, त्यास  प्रतीजन किंवा Antigen म्हणतात.
   ह्या Antibodies जंतू शी दोन हात करून जंतूंची शरीराबाहेर रवानगी करतात.
ही प्रक्रिया जटिल आणि मोठी आहे मी गरजेपूरती , मुळ मुद्दा समजण्या इतकीच इथे सांगितली आहे.
ही innate immunity होमिओपॅथी औषधांच्या रेग्युलर सेवनाने खूप चांगल्या प्रकारे वाढते.

b) ➡मुद्दामहून संपादन केलेली( Aquired immunity)
 म्हणजेच सगळ्या प्रकारच्या लसी (vaccines)
   लस घेतल्याने आपल्याला त्या त्या सन्सर्गा शी लढण्याची शक्ती अगोदरच मिळते, पण ती शक्ती फक्त तेवढ्याच सण्सर्गापुरती मर्यादित असतें.


 आता बघुयात
2) ➡➡कोरोना विषाणू शरीरात नक्की कसे काम करतो -
     कोविड 19 हा विषाणू कुठल्याही कोरोना पॉज़िटिव रुग्णाच्या खोकल्यातील, शिंकामधील विषाणू बिंदू (droplets) आपल्या तोंडावाटे किंवा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो.

आपल्या नाकाच्या व घशाच्या लगतची त्वचा किंवा श्लेश्मल त्वचे तून( mucus memrane) थेट आपल्या श्वसन नलिकेतिल पेशींमधे प्रवेश करतो.

   आपल्य़ा शरीराची सुरक्षा यंत्रणा कुठल्याही जंतूसन्सर्गा साठी तयार असतें.जर तुमची स्वतः ची प्रतिकार शक्ती अतिशय मजबूत असेल तर तुम्हाला एकतर संसर्ग होणारच नाही, आणि झाला तरी खूप सौम्य लक्षणे दिसतील , कारण या विषाणू ला प्रतिकारशक्ती ने बाहेर काढण्यात शरीराला यश येईल आणि तुम्ही पूर्ण बरे होवून यातून सहीसलामत बाहेर याल.

पण जर तुमची स्वतः ची प्रतिकार शक्ती कमकुवत आहे तर हा विषाणू पेशी च्या आत प्रवेश करून अनेक पटीने वाढत राहिल आणि एक एक अशा अनेक महत्वाच्या अवयवांना बाधित करेल.प्रथम लक्षण ताप अंगदुखी आणि सर्दी खोकला सुरू होतो.मग कफ श्वास घ्यायला त्रास होणे धाप लागणे अशी लक्षणे दिसतील.
  श्वसन नलिकेत सुरक्षा यंत्रणेच्या विशेष महत्वाचे कार्य करणाऱ्या पेशी असतात आपण वर पाहिल्या जशा की
 Macrophages
,T cells,
 B- lymhocytes
 Natural killer cells (N K)  अशा अत्यंत महत्वाच्या पेशी यांना टार्गेट करून त्यांनाच गिळंकृत करून विषाणू सर्व  सुरक्षा यंत्रणा विस्कळीत करतो.
 mucus cells किंवा श्लेश्मपेशी आणि सिलिया cilia या पेशी यांनी विषाणूला बाहेर फेकण्या साठी जो श्लेश्म तयार केलेला असतो त्या mucus नेच श्वास नलिका भरायला लागते
त्यात विषाणूंने मोडतोड केलेल्या पेशींचे तेथील अवशेष यांचाही खूप साठा श्वसन नलिकेत साठायला लागतो,
तसेच  cytokines ह्या आपल्य़ा प्रतिकारशक्ती तील प्रतिक्रिया म्हणून पाठवलेल्या द्रवाचाही अतिसाठा रुग्णाच्या फूफूसामधे वाढू लागतो.त्यालाच वैद्यकीय भाषेत cytokine storm म्हणतात .

 यामुळेच पुढे श्वास घ्यायला त्रास होणे धाप लागणे आणि ऑक्सिजन ची कमतरता भासणे अशी जास्त गंभीर लक्षणे दिसतात. Ventilator ची आवश्यकता भासू शकते.आणि रुग्णाची अवस्था गंभीर होवू लागते.
   आणखीही पुढे काही महत्वाच्या अवयवांना कोरोना ची बाधा पोहोचून तिथल्या वेगवेगळ्या अवयवांच्या गंभीर लक्षणा चा समावेश होवू शकतो.
  या सगळ्या त रुग्ण दगावन्या ची शक्यता जास्त असतें.

3) कोरोना किती गंभीर

  अ)➡जरी हा संसर्ग इतका गंभीर असू शकतो तरी याबाबत ची काही खात्रीलायक आकडेवारी अतिशय दिलासा देणारी आहे.
  अ) एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांच्या 80 ते 82℅ रुग्ण हे एकतर लक्षणरहित असतील किंवा आलीच तर अतीसौम्य लक्षणे आढळून आली जसे की नेहमीसारखा साधा सर्दी खोकला ताप इत्यादी

ब) ➡10 ते 12℅ रुग्णाना गंभीर स्वरूपाची लक्षणे येतात जरा जास्त काळ अड्मिट ठेवून व्यवस्थित लक्षणाच्या आधारीत उपचार घेतल्यावर शेवटी बरे होतात आणि रुग्णांना अखेर घरी सोडले जाते.

क) ➡5-6℅ अतीगम्भीर तीव्र लक्षणे असणारे आणि खूप कमकुवत प्रतिकारशक्ती असणारे , बहुधा वय वर्ष 50-60 च्या पुढची जेष्ठ व्यक्ती यांचा या गटात समावेश आसतो.
  यात जीवितहानी होण्याची शक्यता खूप जास्त असतें.

आता बघुयात
4) कोरोना वर काय उपचार उपलब्ध आहेत -
कुठल्याही प्रकारचे औषध खास कोरोना वर काम करणारे सध्या आधुनिक शास्रात (Allopathy)
उपलब्ध नाही.
कुठलीही  प्रतिबंधात्मक लस (vaccine) सध्या उपलब्ध नाही.
जगातील सर्व कुशल शास्रज्ञाचे अहोरात्र यावर काम चालू आहे आणि आशा आहे की लवकरच यावर लस उपलब्ध होईल.
  मग सध्या अड्मिट करून घेतलेल्या रुग्णावर नक्की काय उपचार होतात
तर लक्षणा नुसार औषधांचा आधार फक्त आपण सध्या रुग्णाला देत आहोत. म्हणजे की ताप असेल तर तापाचे औषध, खोकल्यावर खोकल्याचे, उलट्या वर उलट्याचे, ऑक्सिजन कमतरता असेल तर ऑक्सिजन दिला जातो आणि तसेच बाकी लक्षणा नुसार उपचार दिले जातात.

जरी असे असले तरी, अशा रुग्णांना उपचार देणे हेही अत्यंत जिकिरीचे, गुंतागुंतीचे असे काम आहे जे आपले सगळे आरोग्यकर्मी अहोरात्र सेवा देत करत आहेत. त्यांचे आभार मानू तेवढे कमीच आहेत.🙏

    पण मुद्दा हा आहे की निश्चित उपचार उपलब्ध नाहीत.

आता महत्वाचा मुद्दा कि या सगळ्या गोंधळात होमिओपॅथी या उपचार शास्राची ची काय भूमिका आहे.

   आणि सर्व साधारण माणसांना हे कोडं उलगडतच नाही की जर सर्व जगातल्या सर्व उपलब्ध आधुनिक उपचार शास्र काही करू शकत नाहिए, तिथे या होमिओपॅथी चे काय मधेच, कसे शक्य आहे साध्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या सोप्या उपचारांनीं एवढ्या गंभीर रोगाचे निवारण? आणि प्रतिबंध तर शक्यच नाही? असे साधे लॉजिकल प्रश्न पडणे अगदी साहजिक आहे. पण जर या शास्रा चा थोडा जरी अभ्यास असेल तर असे प्रश्न नाही पडणार. पण एवढा ही अभ्यास नसेल, माहिती नसेल तर ती माहिती उपलब्ध करून देणे त्यासाठीच प्रयोजन आहे माझे हा लेख लिहिण्याचे. सर्वांसाठी क्लीष्ट टॉपिक सोपा करून सांगणे.
  मी स्वतः एक पोस्टग्रँजुएट होमिओपॅथी तज्ञ असून गेली 20 वर्षे मी शास्रशुद्ध( pure classical homoeopath) होमिओपॅथी ची प्रेक्टीस करत आहे

मी माझ्या अनुभवा ने काही ठळक मूद्दे होमिओपॅथी विषयी सांगते,जे ने करून कुठल्याही सुज्ञ विचारवंताला निर्णय घ्यायला दिशा ठरवायला सोपे जाईल.

*काय आहे होमिओपॅथी -*

 ➡️ होमिओपॅथी ही साधारण 225 वर्षं जुनी अशी एक शास्रिय उपचार पद्धती आहे, भरपूर अविरत संशोधनाअंती तिचा शोध डॉ समूएल हनिमन जे  मूळचे Allopath होते, त्यांनी जर्मनी मधे लावला.

➡️होमिओपॅथी चे मुळ तत्व' काट्याने काटा काढणे' ह्या कार्यप्रणाली चे आहे

-➡️ होमिओपॅथी मधे औषधे ही कुठलीही रासायनिक घटका( chemcals) पासून न बनता सगळी औषधे ही अरासायनिक घटक जसे झाडे फुले पाने आणि खनिजे इत्यादी पासून बनवतात.

➡️- ही औषधे बनवण्याच्या प्रोसेस अशा असतात की मुळ औषधी वनस्पती खनिजे जसे च्या तशा न वापरता succusion आणि trituration ह्या औषध बनवण्याच्या विशेष पद्धतीने अजून सौम्य केल्या जातात आणि डायलूटेड अवस्थेत दिली जातात.

होमिओपॅथी च्या औषधां चा कार्य करण्याचे मुळ उद्दिष्ट हे शरीराची स्वताच्या स्वता बरी होण्याची शक्ती वाढविणे हीच आहे.
त्याच दिशेने औषधी काम करतात आणि त्यासाठी शरीरात ज्या ज्या उणीवा कमतरता आहेत त्या भरून काढायला शरीराला मदत केली जाते, तशा घटना प्रक्रिया  शरीरात घडवविल्या जातात, यालाच self healing power वाढवणे म्हणतात.
    म्हणजेच शरीराची सर्व अवयवांची सर्व प्रकारच्या बाहेरच्या संकटापासून तसेच जंतू पासून बचाव करण्याची जी शक्ती तीच ती प्रतिकारशक्ती वाढवणे हीच एकमेव कार्यप्रणाली आहे होमिओपॅथी ची आणि तेच तत्व आहे तिचे.

➡️symptom similarity किंवा समचिकित्सा पद्धतीने रुग्णाच्या लक्षणा नुसार औषधे निवडावी लागतात, कारण सर्व रुग्णांना एकच औषध होमिओपॅथी मधे नसते तर           प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या लक्षणा नुसार, त्याच्या देहस्वभावानुसार, व्यवस्थित अभ्यास करूनच एक कुशल     होमिओपॅथी तज्ञ रुग्णाचे  वैयक्तिक औषध शोधून काढून ते त्याला ठरलेल्या मात्रेत, विशेष पद्धतीने विशिष्ट क्रमाने  देतात.

➡️ जुनाट chronic दीर्घकालीन आजार उदा. डाइयबिटीस, उच्च रक्तदाब, पचन व्याधी, हाडांचे मांस पेशींचे जुने आजार, त्वचा विकार, मायग्रेन, डोकेदुखी वजनवाढ , वात ,संधिवातआणि hormonal आजार असे असंख्य आजार यात ज्याप्रमाणे होमिओपॅथी औषधं शरीराची self healing power म्हणजेच immunity म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढवून त्यातून आपल्याला सुखरूप बरी करतात तसेच
    कितीही तातडीच्या तीव्र लक्षणे असणार्या  acute आजारातही होमिओपॅथी तितक्याच जलद गतीने परिणामकारक उपचार करते.
अशा वेळी औषधी तात्पुरत्या स्वरूपात काम करणार्या मात्र लगेच आराम देणार्या अशा असतात त्या असणार्या लक्षणा नुसार दिली जातात.

➡️ असे जरी असेल तरी काही
अत्यंत जटिल आजारात गंभीर, अपघात, आणीबाणीच्या अवस्थेत होमिओपॅथी ही सहाय्यक म्हणून च काम करतील.
आधुनिक वैदयकिय शास्रच Allopathya च ह्या वेळी अत्यंत उपयुक्त काम करेल. हे आजिबात नाकारता येणार नाही.

➡️होमिओपॅथी औषधे एवढी सौम्य diluted अवस्थेत शिल्लक तरी असतात का?की फक्त placebo इफेक्ट असतो?

हो आज पर्यंत भरपूर चाचण्या झाल्या,
खूप सारे invitro प्रयोगशाळेत प्रयोग करून हे सिद्ध झाले आहे की होमिओपॅथी च्या औषधांमधे कितीही डायलूटेड केलेल्या अवस्थेत औषधी कण आणि गुण ठळक शिल्लक असतात.

*आता काही वर्षं पूर्वीच IIT मुंबईच्या संशोधन कक्षेत भारतीय होमिओपॅथी परिषदे तर्फे हा प्रयोग करण्यात आला.त्यांना चैतन्य शील असे प्रभावी होमिओपॅथी औषधी कण व्यवस्थित दिसून आले.
आणि IIT BOMBAY यानी हे प्रयोगाअंती सिद्ध आणि जाहीर केलेय की कितीही dilute केले तरी होमिओपॅथी औषधाचे गुणकारी अवशेष शिल्लक असतात.आणि ते तितक्याच अथवा जास्त परिणामकारकपणे काम करतात. हे पब्लिकली सार्वजनिकरित्या प्रकाशित ही केले गेलेय.

➡️ होमिओपॅथी ह्या शास्रा ची योग्यता येवढी मोठी आहे की 2008 मधील नोबेल लोरिएट सर लुक मॉटांनिएर Sir Luc Montagnier  ज्यांना HIV वाइरस साठी नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. त्यांचे सध्या होमिओपॅथी मॉडेल वर संशोधन चालू आहे. मागच्या वर्षीच त्यांनी त्यावरील अहवाल सादर केलाय.
आणि अत्यंत महत्वाच्या अवस्थेत त्यांचे पुढचे संशोधन अजूनही चालू आहे.
तर अजून काही जास्त शास्रीय पुराव्यांची गरज कदाचित होमिओपॅथी  ला सिद्ध करायला लागू नये.

➡️होमिओपॅथी ही इतकी सौम्य असल्याने ती रुग्णाच्या शरीरात कुठलेही दुष्परिणाम , side effects कधीच करत नाहीत.
म्हणजेच ही औषध अत्यंत सुरक्षित आहेत.

➡️➡️कोरोना वर प्रतिबंधात्मक म्हणून होमिओपॅथी खरच उपयुक्त आहे का?
 आपण वर बघितल्या प्रमाणे होमिओपॅथी औषधे innate जन्मजात प्रतिकारशक्ती वाढवते पण ती दीर्घकालीन आजारात.

जरी होमिओपॅथी ची औषधे प्रत्येक पेशेंट च्या स्वता च्या वैयक्तिक लक्षणा वर दिली जातात तरी काही
कोरोना सारख्या अतितीव्र जलद pandemic acute आजारात होमिओपॅथी मधे
"GENUS EPIDEMICUS " ह्या संकल्पनेचा सहभाग आहे.
जिथे जर खूप मोठ्या रूग्ण्समूहाला जर एकाच प्रकारची लक्षणे दिसत असतील तर, त्या सगळ्या लक्षणा चा नीट अभ्यास करून एक मेडिसिन शोधले जाते जे मेडिसिन बाधा होण्या अगोदर जर लोकांना दिले गेले तर त्या लोकांमधे तात्पुरत्या स्वरूपाची base level immunity वाढून त्यांना संसर्ग होण्याचा संभव कमी होतो.

  याच तत्वाचा विचार करून Indian Council Of Homoeopathy  आणि AYUSH Department of Indian System of Medicines and Homoeopathy. या भारतीय मंत्रालयाने  जेव्हा डिसेंबर मधे चीन मधील वुहान मधील साथीची माहिती मिळाली तसे या कामास सुरुवात केली.
आणि लक्षणा नुसार Arsenicum album 30 अर्सेनिकम अल्बम 30 हे औषध Genus EPIDEMICUS असल्याचे जाहीर केले.

आपण वर बघितल्या प्रमाणे कोरोना विषाणू चा शरीरात प्रवेश झाल्याबरोबर पहिला attack आक्रमण covid 19 हा जंतू  Macrophages आणि B Lymhocytes वैगरे प्रतिकार विशेष पेशी यांच्यावर करतात. तर या Macrophages आणि बाकी महत्वाच्या पेशींच्या संख्या आणि त्यांची ताकत आर्सेनिक आल्बम रेमेडी ने शरीरात वाढल्याचे निदर्शनास आले.
 तसेच भारतातील काही तज्ञ होमिओपॅथी डॉक्टर्स यानी काही इतर देशात होमिओपॅथी प्रतिबंधक औषधाच्या चाचण्या केल्या त्यात आर्सेनिक अल्बम सारखीच लक्षणे असणारे CAMPHOR  1M  हेही औषध परिणाम कारक सिद्ध झाले .camphor 1 M या औषधांने ही सुरक्षा पेशींची वाढ आणि शक्ती वाढून आल्याचे दिसून आले आहे.
 कुठल्याही वैदकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या साध्या माणसाला कदाचित होमिओपॅथीची इतकी साधी सोपी औषधे घेणे फार खात्रीलायक वाटत नसेल पण विश्वास ठेवा ह्या साबुदाण्या सारख्या दिसणाऱ्या गोळ्यांना उगाच नाही magic pills बोलत.
ही औषधे परिणाम कारक नक्की असतात
आणि vaccine लसीएवढी स्ट्रॉंग जरी नसेल कदाचित परंतु तितक्या छोट्या प्रमानातले संरक्षण ही सध्याच्या अवघड परिस्थितीत अत्यंत मोलाचे आहे.

 बर्याच  देशात ,राज्यात हे genus EPIDEMICUS हिवाळा सुरू होण्या आधी हिवतापासाठि देण्यात येते आणि होमिओपॅथी प्रतिबंधक औषध दिलेल्या वर्षी पेशेंट्स च्या संख्येत खूप घट आल्याचे असंख्य उदाहरणे आहेत.


कोरोना होमिओपॅथी प्रतिबंधक औषध प्रत्यक्ष सर्व समुदायाला सरसकट देण्यात बर्याच कायदेशीर औपचारिकता यांची अडचण निर्माण झाली.
समान गुणधर्म असणार्या औषधी नक्की किती उपयुक्त ठरतात यासाठी ह्या औषधी रुग्णाना आधी देवून चाचण्या तर करायला मिळायला हव्यात.
तर तशी कायदेशीर परवानगी आयुश मंत्रालयाला सुरुवातीला नव्हती.
मग आपल्या देशात कोरोना ने बर्यापैकी पाय रोवल्यावर आता मागच्या एक महिन्यात आपल्याला अधिक्रुत परवानगी मिळाली .
प्रथम केरळ मग आंध्र प्रदेश, कर्नाटका आणि आता गुजरात राज्यात बर्याच लोकाना ज्याना कुठलाही संसर्ग झालेला नाही पण ते कोरोना पॉज़िटिव पेशेंट्स च्या कॉंटेक्ट मधे आलेले होते अशा बर्याच लोकांना अर्सेनिकम अल्बम 30 हे मेडिसिन दिले गेले
 आणि विशेष म्हणजे दिलेल्या रुग्णांपैकी 95℅ लोकांना कोरोना ची बाधा अजून झाली नाही.
आणि ज्यांना पॉज़िटिव रिपोर्ट आला त्याना अजिबात लक्षणे आढळली नाहीत किंवा अत्यंत सौम्य लक्षणे आली.
 महाराष्ट्र राज्यातही आता अधिक्रुत रित्या हा औषधाचा विचार युध्द पातळीवर आहें.
 आम्ही स्वता आमच्या क्लिनिक मधे वैयक्तिक पातळी वर कुठल्याही अशा प्रकारच्या चाचण्या करू शकत नाही.
परंतु होमिओपॅथी कौन्सिल ने जाहीर केल्या नंतर असे औषध आम्ही सर्व पेशेंट ला देत आहोत.
तर ज्यांना लेखातली माहिती उपयुक्त वाटली आणि काही खात्रीलायक माहिती मिळाली असेल.ज्यांना स्वता आणि कुटुंबाला होमिओपॅथी औषधांची प्रतिबंधात्मक सुरक्षा हवी आहे त्यांनी आणि
 मी स्वता सर्वांना आवाहन करेल की काही त्रास जर होणार नसेल तर सर्वानी ह्या प्रभावी औषधांनाचा उपयोग नक्की करून घ्यावा.
आपल्या जवळ जिथे प्रॉपर होमिओपॅथी क्लिनिक किंवा औषधालय असेल तिथून
 Arsenicum album हे औषध घेवून यावे नाही मिळाले तर camphor 1 M  हे मेडिसिन आणावे.

➡प्रतिबंधक औषध घेण्याची पद्धत--

ग्लोबूल अवस्थेतील अथवा डाइरेक्ट लिक्विड मिळाले तरी चालेल.
ते घेण्याची योग्य पद्धत

Arsenicum album 30
आर्सेनिक अल्बम च्या
 चार गोळ्या दिवसातून तीन वेळा
सकाळ दुपार आणि संध्याकाळ
असे सलग तीन दिवस

Camphor 1M
 4गोळ्या दिवसातून 2 वेळा
असे सलग 2 दिवस घ्यावे

घेण्याची विधी-
गोळ्या शक्यतो रिकाम्या पोटी घ्याव्या, नसेल तर किमान काही खाल्या नंतर एक तासांनी जिभेवर गोळ्या ठेवून व्यवस्थित चघळून घ्याव्यात. पूर्ण गिळून घेवू नये.
गोळ्या घेतल्या नंतर किमान अर्धा तास काही ही खावू पिऊ नये.
शक्यतो या 3 दिवसात कॉफी कच्चा कांदा लसूण अशा तीव्र चवीच्या गोष्टी घेणे टाळावे

कोरोना जोपर्यंत आटोक्यात येत नाही तोपर्यंत पुन्हा हाच कोर्स महिन्याने रिपीट करा.

घरातील लहान थोराना नक्की दया.


काहीच निश्चित नसलेल्या बाहेरच्या अत्यंत असुरक्षित वातावरणात होमिओपॅथी च्या सौम्य आणि कदाचित छोट्या वाटणाऱ्या सुरक्षेचा त्रासदुष्परिणाम तर नक्कीच काहीही नाहीत.
सुज्ञ पणे विचार करून बघा.

➡️ याही पेक्षा खूप खात्रीशीर होमिओपॅथी ची उपयुक्तता ही कोरोना प्रत्यक्ष झाल्या नंतर आहे.
कारण होमिओपॅथी लक्षणा नुसार दिल्यास ज्या 15℅रुग्णाच्या उपचारांमधे नक्की फायदा होईल.
म्रुत्युदर  नक्की खाली येईल जर day 1 पासून च होमिओपॅथी मेडिसिन दिले गेले तर.
   परंतु दुर्दैवाने होमिओपॅथी ला अशी परवानगी आता पर्यंत मिळाली नव्हती.ICMR Indian Counsil of Medical Research  यानी इतकी दिवस कोरोना पेशेंट्स ला उपचार करायला होमिओपॅथी ला परवानगी नाकारली होती.
परंतु बाकी राज्यातील preventive मेडिसिन चे यशस्वी परिणाम बघून अखेर
अगदी आत्ता 5 दिवसापूर्वी ICMR ने मुंबई तील 2 रुग्णालयात होमिओपॅथी ला सहाय्यक adjuvant म्हणून म्हणजे Allopathy बरोबर उपचार करायला परवानगी मिळाली आहे.

   जर होमिओपॅथीलाही main stream मधे काम करायला मिळाले तर कोरोना युद्धात आपल्याला जास्त चांगले यश मिळेल एवढे नक्की.

लेखाचा विषय बघता माहिती वाचकांना जरा अवघड क्लिष्ट आणि जड वाटली असावी,
परंतु काय पर्याय नाही संकट च असे गहीरे आहे की लढाई ची व्यवस्थित माहिती गरजे पुरती वरवरची का होईना पण प्रत्येक हुशार सुज्ञ व्यक्तीला असणे अत्यंत गरजेचे आहे.
    लेखात दिलेल्या इत्यम्भूत माहितीच्या आधारे वाचक काहीतरी दिशा ठरवू शकतील. होमिओपॅथी बद्दल असणाऱ्या जवळजवळ सर्व समज- गैरसमज यांची उकल मी लेखात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलाय.
मलाही साधे सरळ सोपे लिखाण जास्त भावते पण काळ जरा अवघड आहे. म्हणून या लेखाचे प्रयोजन.
आशा आहे अपना सर्वांना लेखातील माहितीची मदत होईल.
             
                       
                                                                                        डॉ योजना शहा.

Comments

  1. Really informative and useful for current situation

    ReplyDelete
  2. मुद्देसूद आणि अतिशय उपयुक्त शास्रीय लिखाण सोप्या शब्दात..

    धन्यवाद
    क्षितिज भावे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem