बीज प्रबोधिनी
सानिका वाडेकर ( तुकडी २०१२ )
माझ्या आयुष्यातलं प्रबोधिनीचं स्थान सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न, प्रबोधिनीलाच अर्पण..
माझ्या अंगणीचा चाफा
तुझा गंध दरवळे
इंद्रधनू साकाराया
तू किरण कोवळे
माझी भरजरी पैठणी
तू रेशमाची वीण
चक्रव्यूह भेदण्यासी
तूच निषाणीची खूण
सरभरल्या मेघाचे
तू मोकळे आकाश
कुण्या अंधारल्या वाटे
तूझी सोबत प्रकाश
बांध फुटल्या पाण्याची
तू केलीस वाहिनी
माझ्या फुलल्या वेलीचे
तू बीज प्रबोधिनी
- सानिका वाडेकर
Comments
Post a Comment