Posts

बीज प्रबोधिनी

Image
सानिका वाडेकर ( तुकडी २०१२ ) माझ्या आयुष्यातलं प्रबोधिनीचं स्थान सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न, प्रबोधिनीलाच अर्पण.. माझ्या अंगणीचा चाफा तुझा गंध दरवळे इंद्रधनू साकाराया  तू किरण कोवळे माझी भरजरी पैठणी तू रेशमाची वीण चक्रव्यूह भेदण्यासी तूच निषाणीची खूण  सरभरल्या मेघाचे   तू मोकळे आकाश  कुण्या अंधारल्या वाटे  तूझी सोबत प्रकाश बांध फुटल्या पाण्याची तू केलीस वाहिनी माझ्या फुलल्या वेलीचे तू बीज प्रबोधिनी - सानिका वाडेकर

एक संस्मरणीय भेट !

Image
अजित   कानिटकर  (  १९७६   तुकडी ) दिल्ली , साऊथ ब्लॉक , १० डिसेंबर २०१९ , संध्याकाळचा एक तास संस्मरणीय होता . साऊथ ब्लॉकमधे मोठ्या पदावर असलेल्या वर्गमित्राला पुण्याहून निघण्यापूर्वी एस . एम . एस . करून विचारले होते की ' वेळ असेल तर भेटायला आवडेल ', ' कामाची गडबड पाहून कळवितो ' असा लगेच प्रतिसाद आला . दिल्लीत पोहोचण्याच्या आदल्याच दिवशी त्याच्या कार्यालयातून संपर्काचा फोन आला की संध्याकाळी सहा वाजता साऊथ ब्लॉक गेट ९ येथे यावे , पंधरा मिनिट अगोदर पोहोचावे , त्याप्रमाणे प्रवेशपत्र मिळेल .       दिल्लीतील थंडीमधील संध्याकाळ सुंदर असते . मी वेळेपूर्वी पोहोचल्याने काम संपवून घरी जाणाऱ्यांची वर्दळ होती . सैन्यातील विविध पदांवर काम करणारे अनेक अधिकारी त्यांच्या रुबाबदार गणवेशात कार्यालयातून परतत होते . सुरक्षा कर्मचाऱ्याने मोबाईल जमा करून ठेवला व मित्राच्या कार्यालयाच्या स्वागतकक्षात मी वाट पा हात होतो . ब्रिगेडियर यांनी चहा की कॉफी असे विचारू...