Lockdown' - एक अकल्पित युध्दस्थिती आणि त्याचे विवेकी सुज्ञ तणाव नियोजन
' Lockdown' - एक अकल्पित युध्दस्थिती आणि त्याचे विवेकी सुज्ञ तणाव नियोजन
डिसेंबर मधे कुठे दूर चीन देशात सुरू झालेल्या coronaने हळूहळू जागतिक महमारी चे गंभीर स्वरूप धारण करून आता भारतातही त्याचा विळखा मजबूत केला आहे.
सुरुवातीला अवघ्या १५ दिवसासाठी घोषित केलेल्या lockdown आता सलग महिना होऊन गेल्यावरही परिस्थिती आटोक्यात आलेली दिसत नाहिए उलट corona पेशेंट्स ची संख्या वाढतानाच दिसत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस lockdown वाढला जावू शकतो आणि बऱ्याच दिवसांनी lockdown थांबला तरी आपले सर्वांचे रोजचे नियमित सामाजिक आयुष्य पूर्वपदावर यायला पुढील काही महिने लागू शकतात असे तज्ञ।चे मत आहे.
या अचानक ओढवलेल्या व आपले त्यासाठी कसलेही पूर्व नियोजन नसलेल्या lockdown आणि corona महामारी या काळात सर्व क्षेत्रातील स्री,पुरुष ,लहान मोठे सर्वांनाच आयुष्याच्या सर्व थरांवर, सर्व दिशांना प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
या तणावाचे नियोजन विवेकी मनाने logical किंवा rational way ने कसे करता येईल.आपली सदसद्विवेकबुद्धी ने या तणावाचे व्यवस्थित नियोजन केले तर आपण आपल्यावर आणि कुटुंबावर पुढे येवू घातलेल्या अनेक मानसिक शारीरिक आणि आर्थिक समस्यांचे समाधान नक्की करू शकू,
आपण सगळ्यांचे काही ना काही नुकसान तर अटळ आहे पण तार्किक बुद्धीने हा गुंता सोडवल्यास आपले किमान नुकसान होईल हे नक्की.
मी स्वतः एक पोस्ट्ग्रजुएट होमिओपॅथी तज्ञ आहे आणि गेली साधारण 20वर्षे मी शास्रशुद्ध होमिओपॅथी ची प्रेक्टीस करत आहे.
त्यामुळे व्यक्तीच्या मानसिक प्रक्रियाशी खुप जवळून संबंध आहे. त्याचबरोबर मी pscychology आणी specially R E B T ....Rational emotive behavioral therapy तज्ञ म्हणून गेल्या बऱ्याच वर्षापासून आमच्या क्लिनिक मधे होमिओपॅथी उपचाराबरोबर तणाव नियोजनाचे किंवा स्ट्रेस मेनेज्मेंट सेशन्स घेतेय. जवळ जवळ सर्व पेशेंट्स ना या sessions ची बहुमोल मदत होवून त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्वतः ला उपयुक्त विचारपप्रणाली, जीवनशैली आत्मसात करून त्या त्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे.
या सर्व अनुभवांचा ज्ञ।नाचा उपयोग सध्याच्या अवघड परिस्थितीचा सामना करताना सर्वांना व्हावा म्हणून ही पोस्ट लिहिण्याचे प्रयोजन.
आता पाहूयात कि सध्या नक्की काय मानसिक अवस्थेतून आपण सगळे जात आहोत. आपल्याला सर्वान्नाच सध्या कमालीची असुरक्षितता वर्तमानाची आणि भविष्याचिही भासते आहे.
त्यात खालील प्रश्नांचा सहभाग आहे
Lockdown अखेर कधी संपेल? पेशेंट्स च्या वाढत चाललेल्या संख्या कमी का होत नाहित? घराची पूर्ण विस्कटलेली आर्थिक घडी आता कशी परत बसवायची?माझ्या स्वताहाच्या व्यवसायाचा नोकरीचा इतका छान बसवलेला जम आता Lockdown नंतर पूर्ण विस्कटेल ? आणि पुढे जागतीक मंदी येतेय त्याचे परिणाम पुढील कित्येक महिने माझ्या व्यवसायावर कुटुंबाच्या आयुष्यावर ही होणार त्याची नक्की तीव्रता किती असेल? किती दिवस टिकेल? आयुष्य पूर्वपदाला परत येईलच कि नाहि?
आणि त्याही पुढे जावून मला आणि माझ्या कुटुम्बातील कोणाला हा सन्सर्ग झाला तर? त्यात आपण किंवा आपले स्वकीय कोणी दगावले तर??
मग यापुढे आयुष्य च नसेल का?
असे मोठ्या गोलाकारा च्या आवर्तनातून सुरू होणाऱ्या मोठ्मोठाल्या प्रश्नांपासून मग गोलाचा सर्वात मध्य एका भयाण शांत केंद्रबिंदू त होतो तो म्हणजे माझे अस्तित्व च असेल की नाही?🌀🌀🌀
कितीही नाकारले तरी असे असंख्य प्रश्न आपल्या सर्वांना कधी कधी किंवा अगदी रोजच पडत असतील , प्रश्न पडण्याचे आणि भिती वाटण्याचे प्रमाण त्या त्या व्यक्तीच्या मनसिक समतोला वर अवलंबून आहे.
आता आपण पाहूयात की हया प्रचंड तणावाचे नियोजन आणि निचरा अखेर कसा करायचा.
विवेकनिष्ठ मानसशास्र उपचार शास्र आपल्याला काही strategies सांगते.
हया सगळ्या रणनिति आपल्या सदसद्विवेकबुद्धी ला पटतील अशाच आहेत म्हणूनच
त्याचा उपयोग अतिशय समाधानकारक, परिणामकारक आणि शास्रशुद्ध आहेत.
1)Preventive किंवा प्रतिबंधक उपाय योजना (रणनीती फर्स्ट)
▶️ आपल्या सर्वाना आता corona संक्रमण टाळन्यासाठी च्या सर्व उपाय योजना चांगल्या माहीत झाल्या आहेत. त्यात एक तर गरज नसताना आजिबात बाहेर जावू नये, sanitiser आणि mask चा वापर करणे जर नाविलाजास्तव बाहेर जावे लागले तर सोशियल डिस्टेन्स चे सांगितलेले सर्व नियम काटेकोर पणे पाळावे.
। त्या सर्व उपाय योजना कटाक्षाने पाळणे आणि आपल्याला आणि कुटुम्बाचे प्रथम संरक्षण करणे.
2) परिस्थितीचा स्विकार* -
➡️▶️ मानसशास्रात Acceptance/ स्विकार ह्या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्व आहे. कुठल्याही परिस्थिती त आपले 100℅ प्रयत्न दिल्या नंतर त्या परिस्थितीचा संपूर्णतहा स्विकार करणे. म्हणजे परत परत हे असे का? माझ्याच बरोबर का? आता पुढे कसे होणार? मला हे मान्यच नाही असे प्रश्न पडून आपण आणि आपल्या जवळचे लोक उद्वीग्ण किंवा निराश होणार नाहीत आणि त्याच त्याच प्रश्नांना वारंवार विचार करून आपण कुठेच नीट पोहोचत नाहि, मनसिक अवस्थेतील उपयुक्त सुज्ञ स्थिर मनोवास्था तर खुप दूरची गोष्ट.
*3) क्रिया प्रधान रननिति-किंवा Action oriented di⁶rect focusing strategies
▶️➡️ सध्या आपण सर्वजन आर्थिक नुकसानीमुळे प्रचंड तणावात आहोत. तर प्रथम एकदा बसून स्वतः ला प्रश्न विचारा की मी नी माझ्या कुटुम्बाचा जीव ह्या घडिला महत्वाचा आहे की पैसा, आर्थिक स्थिरता आणि व्यावसाईक प्रगती. अर्थातच सर्वांचे उत्तर आपला जीव हेच येईल.
म्हणजेच ज्या गरीब बांधवांचं पोट हातावर चालते, रोज कमवून मग खायला मिळेल आसे घटक सोडता बाकीच्याना ह्या आर्थिक सावटाचे महाभयंकरीकरण अथवा अवाजवी घाबरण्याचे काही कारण नाही.ज्यांची नोकरी ऑनलाइन work from home चालू आहे त्यांना तर वेळ कसा घालवयचा हा फार प्रॉब्लेम नसावा.
आता काय क्रिया प्रधान नियोजन आहे ते बघुयात, आता आपणा सर्वाण्कडे भरपूर वेळ आहे. या वेळेचा हुशारीने वापर करून घेवुन प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातील नवनवीन येवू घातलेले प्रयोग संशोधने यांचा अभ्यास करणे, उपलब्ध असलेले ज्ञ। न, तज्ञ।ची पुस्तके वाचावीत, अनुभव ऐकावे आणि पूर्वी रोजच्या धावपळीत आपापल्या व्यवसायातील, कलेतील, नोकरीच्या कामा संबंधी नवनवीन कौशल्य संपादन करायची राहून जातात ती आता करून घ्यावीत.कलेतील सरावा नेही श्रेणीसुधार होवु शकतो.जसे संगीता तील गायनातील रियाज वाढल्याने त्या कलेतील आपसूक विकास होईल.अगदी ग्रुहीनीनेही घरात उपलब्ध असलेल्या पाक सामुग्रीतुण नवनवीन पाककला शिकूण घ्याव्यात.तिलाही नवीन शीकण्यातला आंनद त्यातुन मिळेल आणि कामातला एकसुरीपणा पण नाहिसा होईल.
अशा प्रकारे आपण पूर्व नियोजित सुज्ञ आणि क्रुतीशील पद्धतीने Lockdown नंतरच्या परिस्थितीशी सामना करायला आपापल्या पद्धतीने पूर्ण तयार आणि सज्ज असू.
यालाच मानसशास्रात psychology मधे
" Ward and Morris"concept संकल्पना म्हणतात. थोड्क्यात आपापली फौज तयार ठेवणे.
4) प्रत्यक्ष दिनक्रम नियोजन -
➡️▶️शेवटी कितीही वैचारीक पातळीवर नियोजन केले तरी जोपर्यंत rootlevel किंवा मुळ दिनचर्येत ते सामाविस्ट होत नाही तोपर्यन्त काही ही उपयोग नाही.
म्हणून आपल्या प्रत्येक दिवसाचे एक सौम्य आणि व्यवस्थित असे planning असावे.
ज्यामध्ये ५ अत्यंत महत्वाच्या क्रुती असायलाच हव्यात
१)आपापल्या क्षेत्रातील ज्ञ।नार्जन , वाचन , लेखन, सराव, रियाज इत्यादी.
*२)आपला आरोग्यपूर्ण पौष्टीक आहार- आहारातील पोषक मूल्ये आपले संरक्षण करत असतात आपली immunity प्रतिकारशक्तीवाढवण्यासाठी अत्यंत गरजेची आहेत.
*३) रोज कुठल्या ही प्रकारचा व्यायाम
Yoga, Pranayam, cardio, aerobics, spot jogging, walking कुठल्याहीप्रकारचा व्यायाम 30 ते 40 मिनिटे आठवड्यातून 5 दिवस तेही आपल्या घरात तेही अगदी नियमितपणे.
व्यायामाचे फायदे खूप आहेत पण सध्या दोन मूख्य उद्देशासाठी आपण व्यायाम करणार आहोत एक म्हणजे व्यायामाने असे काही hormones secret होतात की आपला तणाव स्ट्रेस कंट्रोल् मधे राहायला खूप मोलाची मदत होते.
दुसरे की व्यायामाने आपली प्रतिकारशक्ती वाढते.
*आता एक सुज्ञ व्यक्ती नक्की असा विचार करेल की एकतर मी सगळ्या प्रतिबंधक उपाय योजना खूपकाटेकोरपणे पाळल्याने मी माझे आणि कुटुम्बाचे संरक्करेलच पण एवढे करूनही जर मला किंवा माझ्या स्वकियाना जर corona सन्सर्ग झालाच तर आपली प्रतिकारशक्ती मोलाची भूमिका वाजवणार आहे.म्हणून नियमित व्यायाम आहार आणि दिनचर्या ठेवल्याणे माझी प्रतिकारशक्ती उत्तम असणार.
अशा प्रकारे पुन्हा मानसशास्रातील " Ward and Morris "संकल्पनेनुसार आपली पूर्व तयारी *आपली फौज तयार असेल.
*४) खूप महत्वाचा दिवसांचा घटक म्हणजे आपल्या कूटुम्बाबरोबर 100℅ क्वालिटी टाइम घालवणे.
कुटुम्बा समवेत भरपूर गप्पा जोकस गाणी खेळ खेलावेत आणि दिवसातील काही वेळ रोज सर्वा सोबत घालवा. आवडती पक्वान्ने मधे मधे बणवावीत एकत्र बसून त्यांचा आनंद घ्यावा त्याने घराचा pleasure index वाढतो.
त्याने ऐकमेका बरोबर नाते सुद्रुढ सुंदर तर बनेल च पण त्यातुन मानसिक शांतता मिळेल ती बहुमोल असेल. आणि कुटुम्बाचि स्वताची एक " संघभावना " team feeling तयार होते जी खूप महत्वाची आहे* .
*५ ) स्वसंवाद
रोज किमान 10 मिनिटे कुठल्याहि प्रकारचे ध्यान करावे
ध्यान किंवा कुठल्याहि प्रकारच्या एकाग्रता concentration methods ने आपण ठरवलेले उद्दिष्टे रोज ठाम आणि पुष्ट बनत जातील. आपण पुनःपुन्हा निराशेचा सूर धरूण गळून जाणार नाहि. आणि आपला आत्मविश्वास द्रुढ होत राहील. जो आपला लांबच्या लढाईत उपयोगी पडणार आहे.
त्यावर ध्यानाने मौल्यवान अशी मनशान्ति मिळणार ती वेगळीच उपलब्धी.
अशाप्रकारे जवळ जवळ सगळे मूद्दे मी या लेखात अंतर्भूत केलीआहेत.
*बाहेर दिसणार्या अवाढव्य पसरलेल्या भयावह वाटणार्या संकटा समोर वरकरणी जरी ह्या स्ट्रेटजीस साध्या खूप कमी आवाका असणार्या वाटत असतील तरी हे कायम लक्षात असूद्या की
आपल्याला कितीही भला मोठा डोंगर गड चढायचा असेल तरी सुरुवात माझ्या स्वता च्या पहिल्या पावलांनी होते आणि अशाच नियमित हळूहळू(माझ्या) चालन्याने अखेर मी एक दिवस डोंगराच्या टोकापर्यंत जाउन पोहोचेल आणि पोहोचण्याच्या आंनद साजरा करत असेल,
मी चालायचेच नाही आणि नुसते काळजी करत बसणार असेल तर वर पोहोचण्याची भाषा मीकरूच नये.
**
आशा आहे ह्या पोस्ट चा वाचकांना नक्की काही ना काही प्रमाणात उपयोग होईल.
पोस्ट उपयुक्त वाटल्यास नक्की कळवा
डॉ सौ योजना शहा 😊
Homoeopathic consultant
REBT PSYCHOLOGY SP (विवेकनिष्ठ मानसोपचार शास्र)
PG (Natinal Academy of Homeopathy India)
Address
Milestone Homoeopathy clinic, (center for advanced classical homoeopathy )
514,Business court,
infront of Brand factory Mall,Mukundnagar .
Near swargate Pune.
…

Very well explained and
ReplyDeleteprecise presentation about the positive approach of the uncertain situation outside.
Very logical and thoughtful...
ReplyDeleteEnriching guidance in current situation.