मराठी मुलगी -वाणी कोयाळीकर, इ.६वी मुली एक होती मराठी मुलगी, विलक्षण होती तिची बुद्धी. करीत होती सतत गडबड, घरात चालत असे अखंड बडबड. वय वर्ष झाले दोन, शाळेच्या शोधासाठी सुरु झाले फोन. गल्ली बोळात सर्वत्र भरपूर शाळा, इंग्रजी भाषिक माध्यमाचा भरला होता मेळा. एक शाळा निवडण्यात आली, कारण घराच्या जवळ ती मिळाली. मराठी मुलगी झाली शाळेसाठी आतूर, मनात तिच्या विचारांचे काहूर. नवीन दप्तर नवीन गणवेश, तिला काय माहीत, मराठी होणार होते नामशेष. शाळेचा पहिला दिवस उजाडला, 'डोंट टऑक इन मराठी' चा हल्ला सुरु झाला. शाळेत असे 'हॉर्स रायडिंग' व 'स्विमिंगपूल', मातृभाषेला मात्र दिली होती हूल. दिवस जात होते झटपट, काहीतरी मात्र निसटून जात होते पटपट. मराठी मुलीला शाळेत लागली तहान, इंग्रजी शब्द शोधता शोधता तहान झाली लहान. काय करणार बिचारी बसली शांत गुमान, इंग्रजी माध्यमाचा महिमाच होता तसा महान. मराठी मुलगी विसरून गेली शी-शू तहान भूक, तिच्या अखंड बडबडीला इंग्रजी माध्यमानी लावले हुक. होत्या तिच्याकडे भावना खूप, परंतू माध्यम मात्र होते चूक. अबोल झाली गोजिरवाणी, आई वडिलांना उलगडली त...
Comments
Post a Comment