कोविड पॉज़िटिव आहात? घाबरू नका हुशार व्हा...कोरोना विषयी सखोल माहिती

 

कोविड पॉज़िटिव आहात? घाबरू नका हुशार व्हा...कोरोना विषयी सखोल माहिती 

कोविड पॉज़िटिव?घाबरू नका हुशार व्हा.... कोरोना विषयी सखोल माहिती.....

 डॉ योजना शहा

 मी माझ्या मागील काही लेखा मध्ये Lockdown मधिल विवेकी नियोजन आणि होमिओपॅथी चे प्रतिबंधक उपाय यावर लिहिले त्याला प्रचंड प्रतिसाद आपण सर्वानी दिल्या बद्द्ल धन्यवाद.

    मी या लेखामध्ये अतिशय महत्वाची माहिती आपणास देणार आहे ती म्हणजे कोरोना झाल्यानंतर काय काळजी घ्यायची काय उपाय योजना करायची. नक्कि कसे कोरोना या आजाराचे अतिशय सुटसुटीत तितकेच जागरूक नियोजन करायचे यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहें.
     बाहेर कोरोना रोगाची दहशत अगदी शिगेला गेली असताना माझ्या निदर्शनास आले कि सर्व सामान्य जनतेला कसलीच नीट माहिती या आजाराची नाहीये. 
मला नक्कि कोरोना झालाय का? 
मी यातून वाचेल की नाही?
मी नक्की आता कोणाला भेटू हॉस्पीटल ला कि फेमिली डॉक्टर ला?
मी isolation मध्ये नक्कि किती दिवस रहायचे?
मी नक्कि कधी ऑक्सिजन साठी हॉस्पीटल चि माहिती काढून ठेवावी?
 मी आहार काय घ्यावा?
असे असंख्य प्रश्न माझ्या स्वता च्या पेशंट्स नी आणि त्यांच्या परिचयातील लोकांनी गेल्या काही महिन्यात मला विचारले, 
     आरोग्यकर्मी आहोरात्र सेवा देत आहे पण सामान्य जनते मध्ये हया आजाराची नीट माहिती नसल्याने पेशंट्स बऱ्याचदा धोकादायक अवस्थेत हॉस्पिटल मध्ये अड्मिट होण्यासाठी जातात आणि तिथे beds उपलब्ध नाहीत आणि ऐनवेळी bed अभावी काही ओळखीतल्या लोकांना जीव गमवावा लागला खुप वाईट वाटलें.
   या सर्वांतून च मी यावर लिहायचे ठरवले. मी रीतसर Doctors intensive training घेवुन Covid Educator म्हणून ऑलरेडी काम करतच आहे. इथे सर्व माहिती त्याच आधारे देणार आहे.
 
 
Health Ministry of India' अर्थात आरोग्य मंत्रालय आणि 'Heart care foundation of India'  आरोग्य संस्था गेल्या 8-10 महिन्या पासून कोरोना संसर्गा मध्ये* भारतात आणि भारता बाहेरील 19देशातील या अजारतील पेशेंट्स चा अभ्यास करून त्यानुसार काही मार्गदर्शक तत्वे जाहीर करत असतात.
 *मी त्यासंदर्भात डॉक्टर्स साठी चा Covid intensive educater training program ही केलेला आहे.उद्देश एकच की या संदर्भातील सगळे बारीक सारीक अपडेट्स मला माहीत असावेत.मी खाली देणार आहे ती संपूर्ण माहिती ही हया सगळ्या शास्रीय माहिती आधारे दिलेली आहे माझी वैयक्तिक नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
     माझ्या वैयक्तिक पेशंट्स आणि त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या ओळखीतल्या सर्व जे गेल्या काही महिन्यांपासून मदतीसाठी संपर्क करत आहेत त्यांना तर या ज्ञाना चा उपयोग झाला परंतू मला आणखी आजूबाजूला सर्वसामान्य जनते मध्ये कसलाही awareness नाही फ़क्त भिती आहे,कसलीही खात्रीशीर शास्रीय माहिती नाही त्यामुळे जर आजार झालच तर त्यांसाठी त्यांचे कसलेही नियोजन नाही, फक्त ऐनवेळी येणारा प्रचंड तणाव कारण हॉस्पिटल मध्ये beds उपलब्ध नसतात.हे सगळे बघून मी हा ब्लॉग किंवा लेख लिहायचे ठरवले.

      हया लिखाणा चा आवाका खूप मोठा आहे आपण 2-3 भागात त्याचा अभ्यास करुयात.
     आज खुप महत्वाचा भाग म्हणजे मुळ कोरोना संसर्ग झाल्यावर काय करायचे याचा अगदी सखोल शास्रीय माहिती करुन घेवूयात.
    5महत्वाचे घटक
1) प्रतिबंधात्मक उपाय

2)मुळ आजार व त्याची लक्षणे

3) रक्ताच्या आणि इतर तपासण्या Investigations

4) विषेश काळजी ग्रूप्स

5) कोरोना साठी उपलब्द्ध उपचार

imp**6)सर्वात महत्वाचे- सगळ्या माहितीवर नक्की आता  नियोजन कसे करायचे

1) प्रतिबंधात्मक उपाय

आपण सर्वाना याविषयी बरीच माहिती मिळालेली आहेच, जसे की हा संसर्ग 'droplets transmission' म्हणजेच कोरोना झालेल्या रुग्णाच्या सर्दीतुन,खोकल्यातून येणाऱ्या droplet मधून पसरतो म्हणून 

a) मास्क अगदी प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकाने घालणे - घरगुती कापडी मास्क, surgical मास्क आणि आरोग्य कर्मी नी N95 mask घालावे.

b)कोणाशीही बोलताना 6फीट अंतरावरून बोलावे आणि 5 मिनिटे च्या पेक्षा जास्त वेळ नसावा. कारण हे infection अर्धा तास किंवा जास्त वेळ तुम्ही कोविड पॉज़िटिव पेशंट्स च्या संपर्कात आलात तर होते असे आता पर्यंत मिळालेल्या माहिती प्रमाणे आढळले आहे.

c) बाहेर जात असाल तर चांगल्या प्रतीच्या sanitiser किंवा साधा साबण पाणी हात स्वच्छ धुवावेत

d) जर AC वापरत असाल ऑफीस मध्ये घरात तर ते cross ventilator मध्ये वापरावे म्हणजे आतली हवा बाहेर फेकली जाईल

e)गरज नसेल तर बाहेर जाणे टाळावे.

आता तुम्ही कोविड पॉज़िटिव रुग्णाच्या सानिध्यात आला आहात किंवा तुम्हाला स्वतःला किंवा कुटुंबीयांना लक्षणे जाणवू लागली तर नक्की काय तपासण्या करायच्या  याची माहिती घेवूयात ⏩
 *
1)मुळ आजार आणि त्याची लक्षणे 
मुळ कोरोना आजार हा समजण्यासाठी पाच वेगवेगळ्या टप्प्यात विभागलेला आहे.

   आतापर्यंत आरोग्य विभागाकडून मीळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार कोरोना 1-10 दिवस शरीरात राहतो
त्याचे तीन ठोस टप्पे  वैद्यक शास्राने ठरवले आहेत़
dy1-3  day 3-7आणि  day 7-9 आणि पुढे.
 हे खुप लक्ष देवून वाचा सगळी मेख ह्या दिवसांच्या टप्प्यांत आहे.


 *A) Asymptomatic phase*▶️ लक्षण विरहित टप्पा- जिथे संसर्ग झाला आहे पण अजून लक्षणे आलेली नाहीत.
 
***एक महत्वाचा अर्थ समजून घेवूयात विषाणू चा "Incubation period' उष्मायन काळ म्हणजे या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर प्रत्यक्ष लक्षणे निर्माण होईपर्यंत चा किंवा रोग निर्माण होईपर्यंत चा काळ.
या विषाणू चा Incubation period हा 2-14 दिवस दिसून आला आहे.
    आणि तूमच्या स्वताच्या प्रतिकार क्षमतेनुसार अथवा या विषाणू च्या वेगवेगळ्या strains अथवा प्रकार आहेत त्यानुसार लक्षणे येतात तर काही रुग्णामध्ये कुठलीही लक्षणे दिसून येत नाहीत यालाच लक्षणविरहित *Asymptomatic phase* म्हणतात. 
लक्षणे नसतील  तरी या  phase मध्ये रूग्ण सर्वांना संसर्ग मात्र तेवढ्याच  प्रमाणात करत असतो.
   ह्या प्रकारच्या संसर्गामुळेच जगभरात रुग्णांची संख्या खुप झपाट्याने वाढत आहे. कारण मुळ पेशंट लाच माहीत नसते कि  त्याला कोरोना होणार आहे आणि तो carrier वा वाहक बनून संसर्ग पसरवत आहे ह्या आजाराचा.


 *B)Replication phase* ▶️

 *दिवस १ ते ३ किंवा Day 1 to 3* 

⏩ तुम्हाला दिवस  एक म्हणजे काय हे नीट समजून घ्यायला लागेल. कारण तुम्हाला या पहिल्या दिवसानंतर च पुढचे सगळे दिवस मोजायचे आहेत आणि त्यानुसार च तुम्हाला कळणार आहे की कुठल्या दीवशी जास्त काळजी घ्यायची आहे कुठले दिवस धोक्याचे आहेत.
काय तपासण्या कुठल्या दिवशी करायच्या आहेत़  आणि कीती दिवसानंतर मी इतरांबरोबरच भेटु शकतो मिक्स होवू शकतो.

भरता तील व भारता बाहेरील अशा १९ देशातील या विषाणू च्या रुग्णाच्या लक्षणा नुसार संपुर्ण अभ्यासानंतर  एक ठराविक pattern follow करतो हा वाइरस. ठराविक दिवशी संसर्ग झाला तर तो पाहिले लक्षण निर्माण झाल्यानंतर पुढील 3दिवसात खुप मोठ्या प्रमाणात वाढीचा अथवा गुणाकार म्हणजे प्रचंड संख्या तयार होतात. आणि महत्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचवलायला प्रारंभ  केलेला असतो.
   तर हा दिवस १ - Day1 
म्हणजे तो दिवस जेव्हा तुम्हाला 
↔️अंग कण कण किंवा कसकस होणे ताप नाही पण अंग भरून येणे
▶️अंगात आतून गरम वाटले
▶️थोडी थंडी वाजत असेल
▶️डोके दुखी अचानक जाणवली सलग 2-3 दिवसही डोकेदुखी राहू शकते
▶️डावा डोळा अचानक लाल होणे किंवा ulcer येणे
▶️तोंडाची चव जाणे तोंड कडू पडले अथवा गोड चव येत नाही किंवा पूर्णच चव गेली
▶️अचानक वास यायचे बंद झाले
▶️मळमळ होवू शकते
▶️कानात जड वाटलें आवाज येवू लागले कान ब्लॉक झाला
▶️नाक पुडी बंद झाली नकात irritation जाणवले किंवा सर्दी सुरू झाली थोडी
▶️घशात खव खवले काही दुखले  टोचले किंवा लाल झाला घसा .कोरडा खोकला येत असेल.
▶️खाली पोटात उजव्या side लां दुखू शकते किना पोट दुखले
मळमळ भूक नाहीशी होणे आशी लक्षणे येवू शकतात
लघवी ला आग होवू शकते किंवा वारंवर जायला लागू शकते.
▶️किंवा तुम्हाला ताप येवू शकतो
▶️अंग दुखी पाठदुखीचा त्रास होणे

हीच लक्षणे पुढील दोन दिवसात वाढु शकतात आणि ताप किंवा कमी ही होवू शकतात
पुढे Day 3 ला सर्दी खोकला कमी होवून बाकी लक्षणे वाढू शकतात जसे कि ताप वारंवार येणे 100 च्या पुढेही जावू शकतो आणि त्याबरोबर अंग दुखी वाढू शकते.


 *C)Damage phase* ⏩

 **दिवस ३ते६ किंवा Day3-6* 
 *Most Crucial** 
ही सर्वात महत्वाची phase आहे इथे खुप सावधानता बाळगायला लागते. इथे ह्या phase मधे च मुख्य धोका आहे. इथे रुग्णाच्या फूफूत्सा चा सहभाग येतो.
पेशंट ला pneumonia असेल तर तो इथे  या 4 दिवसात च वाढणार. आणि जे लोक ह्या चार दिवसात गंभीर होणार ते पुढे बरीच दिवस गंभीर असतील किंवा बऱ्याच दिवसांनी बाहेर येतील.
इथे लक्षणा वर बारीक लक्ष ठेवायचे.
जर complications झाले तर याच 3 दीवसात आणि जर हे 3 दिवस नीट सहीसलामत काढलित तर धोका संपला. तुम्ही निश्चिंत होवू शकता.
लक्षणे 
▶️ताप सतत येत असणे
▶️प्रचंड खुप अंग दुखी पाठदुखीचा त्रास होणे
▶️खोकला येणे
▶️छातीत वेदना होणे
▶️श्वास घ्यायला त्रास होणे 
▶️ बोलायला त्रास होणे
▶️ श्वास खोल खोल घेणे आणि बोलताच न येणे.
▶️ श्वास घेण्या संबंधी च्या सगळ्या तक्रारी जास्त असणे
पुढे अजून जास्त झाल्यावर
▶️ एकाच जागी बसून राहाणे गोंधलल्या सारखे बोलणे
▶ बोलणे slurred अडकत बोलणे

बाकी जी लक्षने day 1-3 आहेत़ ती ही जाणवणे

मी याबद्द्ल ची माहिती पुढे काही रक्ताच्या तपासण्या आणि माहिती देणारआहे त्यात हया phase वर अजून जास्त सखोल माहिती घेवूयात.

4) Disappear phase 
 
दिवस ७ ते ९ किंवा Day 7-9

ह्या टप्प्यावर कोरोना विषाणू चे शरीरातील काम संपत आलेले असतें आणी तो आपले शरीरसोडून जात असतो. त्यामुळे सगळी लक्षणे हळू हळू कमी होवू लागतात.
जसे की 
▶️ताप कमी अंतराने आणि कमी तीव्र असणे
▶️ अंग दुखी पाठ दुखी कमी होणे
▶️अशक्तपणा जरा कमी होणे
▶️ सगळी लक्षणे कमी होतात

 F)Post covid phase

 दिवस ९ ते१४  Day9 to 14 आणि पुढे 

दिवस 9 हा तुमचा सर्वात safe सुरक्षित दिवस आहे
तुम्ही आता कोविड फ्री आहात
टेस्ट केली तर पॉज़िटिव येईलकारण आंटिबॉडी असतात परंतु तुम्ही आता संसर्ग पोहोचवत नाहीत.
कोविड 19 शरीरात सोडून गेलेला असतो.
दिवस 14 नंतर तुम्ही बिनधास्त सर्वांमध्ये मिक्स होवू शकता.

आता बघुयात काही तपासण्या आणि त्यांचे महत्व
आणि कोणी करून घ्याव्यात

 *2) रक्ताच्या आणि इतर तपासण्या Investigations** 

काही टेस्ट्स ची माहिती घेवूयात

1) RTPcr TEST- ही कोरोना आजार डिटेक्शन टेस्ट आहे.
घश्यातील नाकाच्या मागील बाजूचा swab घेवुन ही तपासणी केली जाते.
24 तास वेळ लागतो या टेस्ट ला.
70% याचे रिज़ल्ट खात्रीलायक असतात 30%वेळा false पॉज़िटिव येवू शकते.

 2) Rapid antigen test- आपल्या शरीरात प्रतिजैविके तयार झाल्या नंतर ही टेस्ट केली जातो कोरोना आजार झाला आहे कि नाही हे नक्की कळन्यासाठि ही टेस्ट असतें
वेळ - 45मिनिटं
50% खात्री आहे 50% फॉल्स पॉज़िटिव येवू शकते.

कोविड हा वाइरस विषाणू असून ही तो शरीरात खुप प्रचंड प्रमाणात सूज किंवा imflamation निर्माण करते जेव्हा कि विषाणू कधीही सूज निर्माण करत नाही bacteria म्हणजेच जीवाणू सूज तयार करतात शरीरात.
हा एक खुप मोठा गुंता या आजारात आहें. शरीरातील defensive cells म्हणजेच सुरक्षा पेशीं जशा कि ACE2  यांना लक्ष करून अतिरिक्त प्रमाणात सूज निर्माण करते मग ती सूज Lungs Kidney Heart Liver अशा महत्वाच्या अवयवामध्ये सूज निर्माण करून प्रचंड धोका निर्माण करते.
जर आपण वेळेतच काही टेस्ट्स आणि xray केले तर सूज लवकर लक्षात येते आणि धोका टळू शकतो.
तसा धोका जाणवला की consulting डॉक्टर टेस्ट्स करून घ्यायला सांगतील.

3)रक्तातील *ESR CRP*  हे आपल्या शरीरात imflamaation किंवा सूज कूठे आहें का आणि सूज किती प्रमाणात आहें हे कळविते.
 *ESR*- जर esr तूमच्या वयपेक्षा म्हणजे  30 वर्षे आसेल तर 30 हून जास्त esr असू नये अन्यथा धोका आहें
स्रीया मध्ये वय वर्षं +20 असे गणित असते


 CRP - c reacting protein जेवढे जास्त तेवढी सूज जास्त

 CBC- तुमचे lymphocytes कमी होतात आणि हेमोग्लोबिन ही कमी असू शकते

 D dimer test - रक्तातील clotting किंवा गाठी बनण्याची प्रमाण तपासणे.... ही जरा महाग टेस्ट आहें.
लगेच करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी.


 Lungs X-Ray or HRCT CT scan - ही खूप महत्वाची टेस्ट आहें जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतोय आणि crp वाढलेला असतोय
तेव्हा xray आणि ct scan मधून peumonia कीती झालायआणि   कीती गंभीर हे कळते 
आणि वेळेतच हॉस्पिटलला अड्मिट करता येते
कारण ऑक्सिजन ची आवश्यकता या रुग्णांना लागू शकते.

 5) Postcovid -
या phase मध्ये तुम्हाला सगळ्या तक्रारी कमी झालेल्या असतात तरीही ताप कमी तीव्र 3आठवडे राहतो
अशक्तपणा बराच काळ राहू शकतो
तोंडाला चव आणि वास न येणे कधी कधी जास्त काळ राहू शकते
 कुठल्याही छोट्या छोट्या तक्रारी शरीरात कुठेहि पुढे  तीन महिन्यापर्यंत राहू शकते.
पण त्या फार गंभीर नसतात
जे जे कोविड  ने नुकसान शरीराचे केले आहें त्याचे repairing दुरुस्ती शरीरात पुढे 3महिने चालू राहू शकते.
   आणी काही रुग्णांमध्ये शक्य तो तरूण लोकांमधे 14दिवसात ही अगदी सुखरूप बाहेर येवून फ़क्त एक आशक्तपणा पुढे राहतो बाकी काही लक्षणे नाही राहत

 5)विषेश काळजी ग्रूप-

आपण सर्वानी या गंभीर असलेल्या आजाराला घाबरून जाण्याचे कारण नाही पण सावधानता आणि माहिती नक्कि असायला हवी.
जेणे करून आपण आपली काळजी घेवू शकू
 *म्रूत्यूदर* ▶️
एकतर सुखद बातमी अशी कि इतर देशांच्या मानाने आपल्या भारत देशात death rate म्हणजेच म्रुत्यु दर खुप कमी आहे. फ़क्त 2% एवढाच म्रुत्यु दर आपला आहे. बाकी देशांचा  बराच जास्त आहे.

दुसरे महत्वाचे म्हणजे 
 रोगमुक्तता दर प्रमाण* 
 Recovery Rate percentage* ▶️
रोगातून recover होण्याचे प्रमाण ही भारताचे चांगले आहें 80%च्या आसपास
म्हणजेच 80% लोक सुखरूप बाहेर येतात कारण Asymptomatic लक्षणा विरहित असतात, तर उरलेल्या 20%पैकी बरेच जण 12% जास्त तीव्र लक्षणे दिसून येतात पण आजारातुन सुखरूप बाहेर पडतात पण उरलेले 6-8% लोक गंभीर आजारी पडतातआणि काही जनांना आपला जीव गमवावा लागतो आहे.

 *जेष्ठ व्यक्तींना सांभाळा* -
एकतर ज्या ज्या जास्त वय असलेल्या व्यक्तींनी आपपल्या आरोग्याकडे आपल्यामध्ये असणाऱ्या आजाराकड़े गांभीर्याने बघितले आहें त्यांना आजार असूनही सहीसलामत बाहेर येता येतेय.

▶️ *Walking Dead / Happy Hypoxia* 

परंतू एक ग्रूप् असा आढळला ज्यांनी मागील कित्येक वर्षं स्वताची शरीराची एकही तपासणी देखील करून घेतली नाही. वय 60 च्यापुढे असताना अशी बेफीकीरी खुप नुकसान करू शकते.
     तुम्ही लक्षणे आल्यावर डॉक्टर कड़े जाणार ते तुम्हाला विचारतील कि कायकाय आजार आहेत़ तुम्ही कुठलाही नाही असे सांगणार आत्ता ह्या आणीबाणीच्या वेळी. जेव्हा कि ऑलरेडी तूमच्या शरीरात बऱ्याच गंभीर समस्या असू शकतात,
डॉक्टर तुम्हाला तुम्ही दिलेल्या माहितीनुसार बिनधास्त घरी सोडणार जेव्हा कि शरीर अजिबात सुद्रुढ नाही आहें. तुम्हाला पायऱ्या चढताना जास्त दम लागत आसेल तर तूमच्या ह्रूदया संबंधी गंभीर समस्या day 3-7 रक्ताच्या गाठी बनने किंवा रक्त गोठने अशा गंभीर समस्या अचानक काही तासात येवू शकतात,उपलब्ध होवू शकतात, ब्लड प्रेशर अचानक day3-7 वाढून स्ट्रोक बसू शकतो.
तुमची रक्तातील साखरेची पातळी वाढली आसेल तर आजार  Day 3-7 हा टप्पा आतल्या आत infection शांतपणे वाढून तूमच्या डॉक्टर ना काही कळायच्या आत तुम्हाला भयंकर परिणामांना सामोरे जायला लागू शकते.

    कारण तूमच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे कुठल्या तपासण्या day 3-7 करून घेतल्या पाहिजेत  हे तूमच्या डॉक्टर ना गरज वाटणार नाही कारण तुम्ही अगोदर काहीच सांगीतले नाहीत.तपासण्या वेळेत केल्या तर धोका आधीच लक्षात येवून तुम्हाला ऑक्सिजन असलेल्या हॉस्पिटल मध्ये वेळेआधीच अड्मिट केले जाईल.
walking dead या ग्रूप मध्ये इथे पेशेंट ला day 3-7 अतिशय साधी लक्षणे आढळतात.
ऑक्सिजन लेवेल कमी असण्याची कसलीच लक्षणे पेशेंट सांगत नाही.
श्वास घ्यायला त्रास नाही 
श्वास खोल वर घेणे नाही
खोकला नाही
पेशंट अगदी व्यवस्थित बोलत असतात..... आणि suddenly अचानक एखाद्या तासात रुग्णाचा ऑक्सिजन drop झालेला आढळतो आणि रूग्ण अत्यवस्थ होतो.
     डॉक्टर अशा पेशंट ला कशी मदत करू शकतात?

(तळ टीप- compulsory कोणीतरी तरुण लोक वयस्कर लोकां बरोबरच हवेत .त्यांना स्वतःला ही management जमत नाही.)

 आपल्या ला
विषेश काळजी ही वय वर्षं 50 आणि पुढे यांची घ्यायची आहें.
 त्यातही ज्याना अगोदरच मधुमेह, उच्च रक्तदाब,ह्रुदय रोग,कर्करोग,अस्थमा असे आजार आहेत त्यांना विषेश काळजी ग्रूप् बोलतात.

ह्या विषेश काळजी ग्रूप्स साठी विषेश नियोजन लागते त्यासाठी तुम्ही तूमच्या डॉक्टर्स शी स्पष्ट बोलून घेतलेले हवे. म्हणजे तुमची व्यवस्थित काळजी घेतली जाईल,
Day 3-7 हा अत्यंत महत्वाचा ह्या अजारातील टप्पा miss होणार नाही चुकणार नाही.

आता सर्वात महत्वाचे
आपल्याला कोरोना झालेलाअसो वा नसो 
किंवा तुम्हाला शंका आहें कि कोरोना असू शकतो तर
खालील 6मिन walk टेस्ट घरच्या घरी करा आणी आपापले शरीर कोरोना पासून सुरक्षित आहे कि नाही ठरवा.
 *Risk Detection pattern at home* ▶️

एकतर मी वर सांगितल्या प्रमाणे day 1 नीट शोधायचा त्यानुसार day 3-7 या दिवसांची निट काळजी घ्यायची.

 day 1-3 अगोदरच लक्षणे तीव्र वाटतायेत तर तपासण्या करुन घ्या.
त्यात सूज आणि pneumonia लक्षात येईल आणि हॉस्पीटल मध्ये अड्मिट होता येईल.
 
अन्यथा मी खाली सांगते त्याप्रमाणे 
 *६मिनिटं चालण्याची तपासणी-* 
 *6 Minute walk test* ▶️

घरातल्या घरात सहा मिनिटे चाला त्यनंतर चेक करा खालील 6 गोष्टी
1) चालल्या नंतर तुमचेशरीराचे तापमान Temperature on thermometer कीती आले
नेहमी एवढेच आहे तर चांगले

2)तुम्ही किती distance चाललात  500meter पेक्षा कमी नसावे

3)चालल्या नंतर तुम्हाला खोकला यायला लागला तरी laboratoryतपासण्याकरून घ्या

4)तुम्हाला खुप दम लागून श्वास घ्यायला त्रास होवू लागला corona धोका संभवतो

5)जर चालल्या नंतर तुम्हाला नीट बोलणे अवघड झाले तर धोका आहें

6)आणि pulse oximeter वर तुमचे spo2  99-98 पेक्षाकमी झाले


अशा प्रकारे आपल्याला आपली तंदुरुस्ती कळून येते. शंका आल्यास डॉक्टर ना भेटा.

 *pulse oximeter* - शरीरातील ऑक्सिजन लेवेल चेक करण्यासाठी वापरात येणारे हे यंत्र.
पण ऑगस्ट महिन्या पासून त्याचा वापर सर्रास घरोघरी होताना दिसतो.
    तुम्ही isolation मध्ये असला आणि तुम्ही कुठल्याही डॉक्टरांच्या मार्गदर्शना खाली नाही आहात तर हे यंत्र नक्कीच तुम्हाला मदत करेल.
    डॉक्टर स्वता पेशेंट्स शी बोलून बाकी सर्व डीटेल्स घेवूनच ठरवू शकतात. कारण हॉस्पिटल मध्ये वापरात येणारे pulseoximeter हे पूर्णतः accurate असतें घरी मिळणाऱ्या यंत्रात खूप त्रुटी संभावतात.जर ऑक्सिजन 90 च्या वर असेल तरच त्याचे रीडिंग ग्राह्य धरावे. 90 च्या खाली 80-60-40 असें काहीही चुकीचे error येवू शकतात तेवा बाकी parameter चेक करूनच निर्णय घेता येतात.
ऑक्सिजन लेवेल चेक करण्याचीही एक ठराविक पद्धत असतें ती घरी नीट घेतली नाही तरी reading चुकीचे येवू शकते.

  *6)कोरोना साठी उपचार -** 
कुठल्याही वैद्यक शास्रात कोरोना साठी ठोस औषध नाही.  परंतू लक्षणा नुसार औषधं दिली जातात.
   एकदा हॉस्पिटल मध्ये अड्मिट केले गेले कि गंभीर ता लक्षात घेवुन तुमची सर्वोतोपरी मदत केली जाते.
ऑक्सिजन ventilators आणि steroids काही ठराविक antibiotics आणि vitamins देवुन तुम्हाला मदत केली जाते

 *होमिओपॅथी*आणि कोरोना* ▶️ अशीही होमिओपॅथी औषधे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवून च़ कार्य करतात म्हणून जे safe zone म्हणजे ज्यांना बाकी कुठलाही गंभीर आजार नाहीत अशा रुग्णांना आम्हि गेली 5महिने होमिओपॅथी औषधं paracetamol/Mefanamic a काही vitamins आणि गरज लागेल तसे investigations अशा व्यवस्थित नियोजनाने बऱ्याच कोविड पॉज़िटिव पेशंट्स ना सुखरूप बाहेर यायला मदत करू शकलो याच खरच समाधान आहे.
परंतू अतीशय गंभीर पणे ह्या cases हाताळव्या लागतात. रुग्ण घरि आमच्या मार्गदर्शन खाली असतो त्याच्या बरोबरच सतत संपर्क ठेवावा लागतो. day 3-7 मध्ये अक्षरश दिवसातून अनेकदा. कारण सतत विचारून माहिती घेवूनच धोका वेळेत शोधता येतो. पेशंट नी डॉक्टरांना त्याआधी नीट माहिती देणे अत्यंत गरजेचे आहें.कुठलाही मोठा आजार शरीरात नाही याची पेशंट नी नीट काळजी आधीपासून घेतलेली असावी. अथवा असेल आजार तरी तो पूर्णतः कंट्रोल मध्ये असावा.अन्यथा आतल्या आत आजार बळावतो आणि धोका संभवतो.
     व्रुद्ध व्यक्ती असतील तर कोणीतरी तरुण त्यांच्या सोबत असतील तर लक्षणे निट ओळखता येतात. आम्हाला व्यवस्थित माहिती मिळते अन्यथा फक्त फोन वरील बोलण्या वर उपचार करायचे असतात माहिती अतिशय योग्य असावी लागते.तरुण लोक हे समजू शकतात आणि वेळेत मदत करू शकतात.

आमचे होमिओपॅथी च्या औषधांचे किट आम्हि पेशंट कड़े दिलेले असतें त्यातून लक्षणा नुसार आम्हि औषधे बदलत राहतो.
आणि खुप साऱ्या पेशंट ना आम्ही बरे करू शकलो.


 आहार आणि प्रतिकारशक्ती
 -▶️ day 1-14 सगळे दिवस प्रोटीन युक्त आहार द्यावा
▶️ भरपूर कोमट पाणी घ्यावे
▶️ भरपूर लिक्विड पदार्थ
▶️आजारी असतानासूज वाढेल असें पदार्थ आहारात घेवू नयेत
जसे कि पांढरेतांदूळ,मैदा, जंक्स फूड आणिजास्त थंड पदार्थ घेवू नये.
▶️ vitamin C D B आणि zink 
ही प्रतिकारशक्ती वाढवतात म्हणून ती घ्यावी.

▶आजार होण्या अगोदरच नेहमीच
सर्व ७ रंग असणार्या भाज्या आणि ५प्रकारच्या चवी असणारे जेवण नेहमीच जेवणात असावे त्याने प्रतिकारशक्ती वाढते.

imp**6)सर्वात महत्वाचे- सगळ्या माहितीवर नक्की आता  नियोजन कसे करायचे
1) आपण कोणी कॉरोनरी पॉज़िटिव व्यक्तीच्या सानिध्यात  
आलो आहोत का? जर हो तर

आणि कोविड पॉज़िटिव पेशंट च्या कॉंटेक्ट मधे जारी  नसाल आलात तरी

--a)जर तुमचे वय 40 च्या आत आहे आणि कुठलाही मोठा आजार तुम्हाला नाही तर day 1  ची लक्षणे सुरू होईपर्यंत तणाव घेवू नका.

--b)ज्यांचे वय 40 च्या पुढे आहें आणी काही दिर्घ आजार जसे मधुमेह, उच्च रक्तदाब , ह्रुदय रोग, किंवा बाकी प्रतिकारशक्ती च्या रिलेटेड किंवा कुठलाही आजार ऑलरेडी आहे तर आशा आहे की तुम्ही वेळच्या वेळी दिलेली औषधे आणी पथ्य पाळत असला आणि आजार कंट्रोल मध्ये ठेवलेला आहे यापूर्वी च याङा गोष्टींचे नियोजन झालेले हवे.
ज्यांचे असें मोठे आजार असणाऱ्या नी आपले आजार कंट्रोल मध्ये आहेत़ की नाही हे लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांना भेटून असें त्याचे नियोजन करून घ्यावे.
उदा. जर मदूमेह आहे आणि रक्तातील sugar कंट्रोल मध्ये आहे. तर ठिक आहे नसेल तर तूमच्या डॉक्टरांना भेटून गोळ्या व जीवनशैलीतील बदल करून शुगर लेवेल कंट्रोल मध्ये आणा.
उदा. जर तुम्हाला ह्रुदय रोग आहे तर त्याचे सगळे parameter नीट चेक करून वेळेवर औषध घेवुन कंट्रोल मधे असावे नसेल टर डॉक्टरांना भेटून लगेच करून घ्या

वेळ सांगून येत नाही, बेफीकीरी कदाचित फार नुकसान करेल.

आता जर  तुम्ही कोरोना रुग्णाच्या कॉंटेक्ट मध्ये आलाय किंवा घरात आचन कोणी घरातील पॉज़िटिव आले तरी घाबरू नका तुम्ही वयस्कर आहात आणि सोबत मोठे आजार आहेत तर तुम्ही पाहिले लक्षण आल्याबरोबर 
RTpcr TEST करून घ्यावी.पॉज़िटिव आसेल तर डॉक्टरांना भेटून अथवा फोन वरून कळवा आणि   day 3-7 चे सर्व नियोजन करा day 1-3 च जर तीव्र लक्षणे आली टेस्ट रिपोर्ट्स मध्ये crp आणि esr वाढलेला आला तर आणि  CT scan किंवा  XRay फाइंडिंग जर धोकादायक व्हायला लागली आहेत़ तर हॉस्पिटल मध्ये अड्मिट व्हा.
पुढे हॉस्पीटल तुमची काळजी घेईल
 
-घरीच आहात तर 6मिनिटं walk TEST रोज 2 वेळा करायचीच आपली अजारातील तंदुरुस्ती कळत राहते.

(तळ टीप- compulsory कोणीतरी तरुण लोक वयस्कर लोकां बरोबरच हवेत .त्यांना स्वतःला ही management जमत नाही.)

2)इतर तरुण लोक आणि बाकी आजार नसणाऱ्या नी दिवस 1 निट ओळखा
day 3-7 निट लक्ष ठेवा
वाटल्यास  CBC ESR हे करून घ्या गरज असेल तर CT scan or xray 
शक्यतो ह्या कसल्याही गोष्टींची गरज पडत नाही लक्षणे आणि 6मिनिट walk TEST + किंवा व्यवस्थित आहे तर तुम्ही सगळे सुखरूप बाहेर येणार आहात.
व्यवस्थित आहार घ्या

3) जर घरात वयस्कर आणि मोठ्या आजार असलेले वव्यक्ती आहेत़ तर हे घरि आणून ठेवा.
१)थर्मॉमीटर
२)एलेक्ट्रॉनिक BP मशीन
३)pulse oximeter
४) कोणीतरी तरुण ....नक्कि त्यांच्या सोबत कोणीतरी तरूण घरि हवे सगळी काळजी घ्यायला.

4)
तुम्ही कोरोना पॉज़िटिव आहात तर लक्षणांवर नजर ठेवा 
days3-7 निट लक्ष दया घाबरू नका
एक चार्ट बनवा 
-ताप ऑक्सिजन लेवेल आणि 6मिनट walk टेस्ट
कुठेहि गडबड वाटली ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

तुमच्या लक्षात आलेच आसेल एव्हाना कि-
कोरोना ला घाबरू नका पण हुशार मात्र व्हा नीट नियोजन करा जागरूक व्हा तर नक्कि सहीसलामत बाहेर याल.
त्याच बरोबरच बेफीकीरी ignorance नक्की त्रासदायक होवू शकेल.

*** आमचा संपर्क डाइरेक्ट पेशंट्स शी रोज असल्याने आम्हाला, मला आणि माझ्या फेमिली ला  july मधेच कोरोना होवून गेला आहें तरी वरील लक्षणा चा अनुभव  असल्याने हेच नियोजन घरी व्यवस्थित फॉलो केलेत तर भिती कसलीच नाही.
घाबरू नका.

 *वरील सर्व माहिती मी तुम्हाला नियोजन करायला मदत व्हावी म्हणून दिली आहे तरी कोणीही त्या आधारावर treatement घरी करू नये.  कुठेहि Risk धोका आढळला तर आपल्या जवळच्या डॉक्टरांना नक्की दाखवून घ्या. त्यांच्या मार्गदर्शन खाली रहा. माहिती असल्याने विनाकारण अतिरिक्त तणाव, काळजी *तसेच बेफीकीरी ही येणार नाही म्हणून ही माहिती.

माहिती चा आवाका फार मोठा आहे परंतु ही सर्व माहिती एकाच ब्लॉग मध्ये बसविण्याचा प्रयत्न मी केला आहें जेणे करून एकाच लेखात सर्व माहिती तुम्हाला सर्वांना तूमच्या नातेवाईकांना ही share करता येईल.
   हया विषयावर खूप अजून माहिती आहें मी अतीमहत्वा चे मूद्दे इथे cover केले आहेत.
बाकी पुढील ब्लॉग मध्ये लिहीत राहील.
आपणा सर्वांना या आणीबाणीच्या काळात मदत व्हावी म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न.
तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही कॉंटेक्ट करू शकता.

डॉ योजना शहा
होमिओपॅथी तज्ञ
PG (Natonal Academy Of Homoeopathy India)
REBT sp Pscychology 
Milestone Homoeopathy Pune
Mukundnagar Pune.

Comments

Popular posts from this blog

कविता -.मराठी मुलगी

Creativity

Poem