तू येशील ना?
तू येशील ना?
तू येशील ना?
माझ्या पहिल्या पायरीशी तुझं मस्तक लवेल
धूळ कपाळाला टेकेल
वर पाहशील
तुला दिसतील ते लांबवर जाऊन थांबणारे डोळे
तो उद्धरलेला हात
म्हणशील मग तू मनात,
'अप्पा, लक्ष असुद्या!'
त्यांचं लक्ष आहेच रे,
पण तुझं इकडे फिरकेल ना?
तू, नक्की येशील ना?
आठवतं, त्या दिवशी चिखलात न्हाऊन आला होतास
आणि नाचत नाचत मलाही चिखलाने माखवून गेला होतास
चिखल धुतला जातो रे, ठसे तसेच राहतात.
तू आलास तर तुलाही दिसतील
तुझ्या आधीचे, नंतरचे असेच अनेक ठसे
पण तू येशील ना?
प्रयोगशाळेतला चुकून फुटलेला बीकर,
वर्गात जायचे विसरून ग्रंथालयात काढलेले तासंतास
चंद्राच्या सोबतीने केलेली कळसावरची भटकंती,
तुला काय वाटले, तू तेव्हा एकटा होतास?
नाही रे बाळा,मी सारे पाहिले आहे,
तुला अंगाखांद्यावर खेळवले आहे
पुन्हा एकदा कळसावरून चंद्र पाहायला येशील ना?
ताशावरचं पाहिलं तड, नाचणारा ध्वज,
वाजणारा ढोल, लेझीमचे छन, बर्चीचे हात,
निळ्या गुलाबीच एक महासागर,
काय? काही आठवलं का?
स्मृतीच्या गुहेत गजानन गरजला का?
आजही सागर महा आहे,
तुला वाटेल, एका थेंबाची काय उणीव आहे?
मला जाणवते.
सारे विसरतील
पण मी?
मला तर तुझ्या चाहुलीनेही ओळख पटते
तीच चाहूल परत केव्हा लागेल रे मला?
ते प्रकल्प, त्या स्पर्धा, ती नाटके, ते कार्यक्रम
ती व्याख्यानं, त्या तयाऱ्या
ती भांडणे, ते खेळ,
कधी खाल्लेला ओरडा, क्वचित पाठीवरची थाप
दलावरच्या शिक्षा
विद्याव्रताचा होम
गडावरचा मुक्तछंद
शिबिरांची गूढ मजा
काही गोष्टी तर तू कुणाकुणाला सांगितल्या नाहीस
पण मला कळल्यावाचून कसं राहील?
खरं सांगू?
आला नाहीस तरी चालेल.
पण मला विसरू नकोस
जिथे असशील तिथे
धागा तोडू नकोस
परत येऊ नकोस हवे तर
जिथे जाशील तिथे मला घेऊन जा
मी तुझी प्रबोधिनी बोलतीये
जिथे जाशील,
तिथे,
मला घेऊन जाशील ना?
ऐश्वर्या अभ्यंकर, ९ वी,
तू येशील ना?माझ्या पहिल्या पायरीशी तुझं मस्तक लवेल
धूळ कपाळाला टेकेल
वर पाहशील
तुला दिसतील ते लांबवर जाऊन थांबणारे डोळे
तो उद्धरलेला हात
म्हणशील मग तू मनात,
'अप्पा, लक्ष असुद्या!'
त्यांचं लक्ष आहेच रे,
पण तुझं इकडे फिरकेल ना?
तू, नक्की येशील ना?
आठवतं, त्या दिवशी चिखलात न्हाऊन आला होतास
आणि नाचत नाचत मलाही चिखलाने माखवून गेला होतास
चिखल धुतला जातो रे, ठसे तसेच राहतात.
तू आलास तर तुलाही दिसतील
तुझ्या आधीचे, नंतरचे असेच अनेक ठसे
पण तू येशील ना?
प्रयोगशाळेतला चुकून फुटलेला बीकर,
वर्गात जायचे विसरून ग्रंथालयात काढलेले तासंतास
चंद्राच्या सोबतीने केलेली कळसावरची भटकंती,
तुला काय वाटले, तू तेव्हा एकटा होतास?
नाही रे बाळा,मी सारे पाहिले आहे,
तुला अंगाखांद्यावर खेळवले आहे
पुन्हा एकदा कळसावरून चंद्र पाहायला येशील ना?
ताशावरचं पाहिलं तड, नाचणारा ध्वज,
वाजणारा ढोल, लेझीमचे छन, बर्चीचे हात,
निळ्या गुलाबीच एक महासागर,
काय? काही आठवलं का?
स्मृतीच्या गुहेत गजानन गरजला का?
आजही सागर महा आहे,
तुला वाटेल, एका थेंबाची काय उणीव आहे?
मला जाणवते.
सारे विसरतील
पण मी?
मला तर तुझ्या चाहुलीनेही ओळख पटते
तीच चाहूल परत केव्हा लागेल रे मला?
ते प्रकल्प, त्या स्पर्धा, ती नाटके, ते कार्यक्रम
ती व्याख्यानं, त्या तयाऱ्या
ती भांडणे, ते खेळ,
कधी खाल्लेला ओरडा, क्वचित पाठीवरची थाप
दलावरच्या शिक्षा
विद्याव्रताचा होम
गडावरचा मुक्तछंद
शिबिरांची गूढ मजा
काही गोष्टी तर तू कुणाकुणाला सांगितल्या नाहीस
पण मला कळल्यावाचून कसं राहील?
खरं सांगू?
आला नाहीस तरी चालेल.
पण मला विसरू नकोस
जिथे असशील तिथे
धागा तोडू नकोस
परत येऊ नकोस हवे तर
जिथे जाशील तिथे मला घेऊन जा
मी तुझी प्रबोधिनी बोलतीये
जिथे जाशील,
तिथे,
मला घेऊन जाशील ना?
ऐश्वर्या अभ्यंकर, ९ वी,
Just loved your poem🙂
ReplyDeleteखूप छान 👌 👌
DeleteAwesome poem👍👌👌
ReplyDeleteखूप छान कल्पना... कविता मस्त..👌👌🌹🌹
ReplyDeleteAmazing poem and outstanding concept of the school talking to its students..... 🙏🙏🙏👌👌👌
ReplyDelete